पिंपळगाव हरेश्वर येथील गायकवाड कुटुंबीयांनी दिला मदतीचा हात,विद्यार्थ्यांना वही पेन वाटप

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वरसाडे तांडा येथील गरजु विद्यार्थी, ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाहीत अश्या विद्यार्थ्यांना पिंपळगाव हरेश्वर येथील गोशाळा संस्थापक,सचिव राजेंद्र गायकवाड,माता पिता गोशाळा सेवाभावी संस्था अध्यक्ष मनोज गायकवाड, उपअध्यक्ष दिनेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून गरजु विद्यार्थ्यांना वही पेन देऊन पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्यात.
वह्या पेन वाटपाचा वेळी शिक्षक,शिक्षिका, मुख्याध्यापक साईदास राठोड , परशुराम पवार ,चारु राठोड ,वाणी सर,प्रणव महाजन ,अरुण पाटील , संजय मालकर,राकेश जैन,सुभाष सावळे,गोरख पाटील,राजेंद्र गायकवाड, आशिष बडगुजर, मयुर रामेश्वरी,त्रिशरण सावळे, दिनेश गायकवाड उपस्थित होते तर लोकाभिमुख उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल आभार परशुराम पवार व पी.पी.पाटील यांनी मानले.




