डोकलखेडा येथील तरुणांचा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश
पाचोरा-
शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुक्यातील डोकलखेडा येथील ५० च्या वर तरूणांनी पक्षात प्रवेश घेतला.दररोज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढतच असून आज देखील पाचोरा तालुक्यातील डोकलखेडा येथील ५० पेक्षा जास्त तरुणांनी पक्षात प्रवेश घेतला. पक्षात प्रवेश घेणाऱ्यांचे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी स्वागत करत त्यांना आगामी राजकीय वर्चस्वाच्या लढाईसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्यासह शरद पाटील, दादाभाऊ चौधरी, ॲड. अभय पाटील, दत्तू अहिरे, अनिल सावंत, एकनाथ महाजन, संदीप जैन, शशिकांत बोरसे, संतोष पाटील, मिथून वाघ, हरीष देवरे, मनोज चौधरी, डी.डी.नाना, संजय चौधरी, किरण पाटील, अरूण तांबे, धर्मसिंग पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती.