क्राईमराज्य

उरण!यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखच्या पोलिसांनी आवळ्या मुसक्या..

उरण-

उरणमध्ये यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची २५ जुलै रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी २७ जुलै रोजी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला कर्नाटकातील गुलबर्गा शहराजवळील शाहपुर येथून अटक करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे.दरम्यान, यावरून यशश्रीच्या आईने अंत्यत संतप्त प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.

“माझ्या मुलीला जेवढा त्रास झाला तेवढंच त्यालाही टॉर्चर करून फाशी दिली पाहिजे. हे प्रकरण फॅस्ट ट्रॅकवर चालवलं पाहिजे. माझ्या मुलीप्रमाणे ज्या मुली तडफडून गेल्या आहेत, त्यांनाही न्याय द्या. म्हणजे माझ्या लेकीलाही समाधान मिळेल. पण माझ्या मुलीला त्याने जेवढा त्रास दिला तेवढाच त्रास त्याला द्या आणि फाशी द्या. सध्या प्रकरण चर्चेत आहे म्हणून शिक्षेचं आश्वासन दिलं जाईल. पण त्याला फाशी दिलीच पाहिजे”, असं यशश्रीच्या आईने सांगितलं

“प्रशासनाने या प्रकरणात कडक कायदा तयार केला पाहिजे. निर्भया प्रकरण झाल्यानंतर सरकारला जाग आणि कायदे तयार केले गेले. पण असे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे कायद्यात कठोर तरतूद केल्या पाहिजे”, अशी मागणी यशश्रीच्या वडिलांनी केली आहे.

पोलिसांना सांगितला हत्येचा घटनाक्रम

२५ जुलैला यशश्री शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर २६ जुलैच्या रात्री या मुलीचा मृतदेह आम्हाला सापडला. त्यानंतर शनिवार सकाळी म्हणजेच २७ जुलैला हत्येचा गुन्हा आम्ही दाखल केला. या प्रकरणात आम्ही दोन ते तीन संशयित शोधले होते. त्यांच्या शोधासाठी आम्ही नवी मुंबई आणि कर्नाटक या ठिकाणी शोध पथक पाठवलं. ज्या गोष्टी आम्हाला कळत होत्या त्या कर्नाटकमध्ये आम्ही पथकाला देत होतो. त्यानंतर दाऊद शेखला अटक करण्यात आली. दाऊदचं नेमकं लोकेशन काय? ते आम्हाला सापडत नव्हतं. आम्हाला हे समजलं होतं की दाऊद शेख कर्नाटकचा आहे. त्यानंतर त्याचे नातेवाईक, त्याचा मित्र या सगळ्यांची माहिती आम्हाला कामाला आली. यातला मोहसिन नावाचा संशयित हा मुलीच्या संपर्कात होता. मात्र त्याने हत्या केलेली नाही. दाऊद आणि यशश्री या दोघांचा काहीही संपर्क नव्हता. त्याची अधिक चौकशी आम्ही करतो आहोत. कारण त्याने गुन्हा मान्य केला आहे असं पोलिसांनी सांगितलं.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!