एमआयडीसी करीता महसुल कडून जागा मिळाली आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रयत्नांना यश
भडगाव-
तालुक्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या अथक पाठपुराव्यामुळे एमआयडीसी मंजुर झाल्यानंतर पुढचे पाऊले ही वेगाने पडायला सुरवात झाली आहे. औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक जागा महसुल विभागाकडून औद्योगिक विकास मंडळाला वर्ग झाली असून. नगरदेवळा सूतगिरणी जवळील जागेच्या सिमांकणासाठी निविदा काढण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच प्लाॅट पडून प्रत्यक्षात व्यवसाय उभे राहू शकणार आहेत.
आमदार किशोर पाटील यांनी गेल्या 7-8 वर्षापासून भडगाव तालुक्यात नगरदेवळा सुतगिरणीजवळ एमआयडीसाठी मंजुरीसाठी प्रयत्न चालविले होते. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तेथे 70 हेक्टर जमिनीवर एमआयडीसी उभी राहणार आहे. त्यामुळे तालुक्यात हजारो रिकाम्या हातांना काम मिळू शकणार आहे.
”महसुल’कडुन मिळाली जागा
एमआयडीसी मंजुर झाली होती. मात्र ज्या जागेवर ही एमआयडीसी उभी राहणार होती. ती जागा महसुल विभागाची होती. त्यामुळे महसुल विभागाने औद्योगिक विकास महामंडळाकडे 5 कोटी 29 लाख रूपये मोबदला मागीतला होता. मात्र ती रक्कम जास्त असल्याने जमिनी हस्तांतरणाचे प्रकरण रखडले. त्यामुळे आमदार किशोर पाटील यांनी यासाठी पुढाकार घेत जमिनीच्या मोबदल्याची रक्कम कमी करण्याबाबत शासनाकडे मागणी लावून धरली. अखेर शासनाने मागणी मान्य करत 49.29 हेक्टर जमिनीचा मोबदला म्हणून 1 कोटी 68 लाख रूपये भरणा करण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाला सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी महसुल विभागाला ठरलेली कब्जा रक्कम भरली.
72 हेक्टर एमआयडीसी होणार
महसुल विभागाला कब्जा रक्कम एमआयडीसीने दिल्यानंतर 49.29 हेक्टर जमीन एमआयडीसीच्या ताब्यात मिळाली आहे. आता औद्योगिक विकास महामंडळाकडून त्याचे सिमांकन करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. तर सिमाकंन झाल्यानंतर प्लाट पाडण्यात येणार आहे. 49 हेक्टर शासकीय जमिनीशिवाय 22 हेक्टर खासगी जमिनी ही संपादित करण्यात येणाथ आहे. त्यामुळे लवकरच भडगाव औद्योगिक विकास वसाहतीत प्रत्यक्षात उद्योग उभे राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रतिक्रीया
भडगाव तालुक्यात आपण 132 केव्ही सबस्टेशन ची निर्मिती केली. गिरणावेर 5 पुल केले. त्याप्रमाणेच भडगाव तालुक्यातील तरूणांना रोजगाराचे साधन स्थानिक पातळीवरच उपलध्द व्हायला पाहीजे या उद्देशाने मी मागील पंचवार्षिक पासून एमआयडीसीसाठी प्रयत्नशील होतो. एमआयडीसी मंजुर करू शकल्याचे मोठे समाधान आहे. लवकरच तेथे सुविधा निर्माण करून मोठे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करू.
-किशोर पाटील आमदार पाचोरा-भडगाव