जळगाव जिल्हा

1ऑगस्ट पासून मध्य रेल्वे 10 दिवस घेणार मेगाब्लॉक, भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरीकांना बसणार फटका..

भुसावळ-

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोठा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या 1 ऑगस्टपासून 11 ऑगस्टपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे. या काळात अनेक अभियांत्रिकी काम केली जाणार आहेत. त्यामुळे हा विशेष मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकचा प्रवाशांना चांगलाच मनस्ताप होणार आहे. तसेच भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर एक मोठा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकदरम्यान नागपूर-भुसावळ दरम्यान धावणाऱ्या तब्बल 11 गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या तारखांना या फेऱ्या रद्द असतील, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. विभागात तांत्रिक कार्य करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जात आहे.

‘या’ कारणासाठी मेगाब्लॉक
सेलू रोड स्थानक येथे ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जात आहे. सेलू रोड स्थानक येथे ‘यार्ड रिमोडूलिंग’ आणि ‘इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग’ कार्यासाठी ‘प्री नॉन इंटरलॉकिंग’ आणि ‘नॉन इंटरलॉकिंग’ कार्य यादरम्यान केले जाणार आहे. तसेच तिसरी मार्गिका आणि चौथी मार्गिका, वर्धा-नागपुर दरम्यान ‘लाँग हॉल लूप लाईन’ला ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येत आहे. त्याचे कामही या विशेष ब्लॉक दरम्यान केले जाणार आहे.

‘या’ एक्सप्रेस गाड्या होणार  रद्द
या मेगाब्लॉकमुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या गाड्यांमध्ये बदल करण्यात आला. गाडी क्रमांक 12119 अमरावती -अजनी एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 12120 अजनी -अमरावती एक्सप्रेस 1 ते 3, 5, 6, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द असेल. तसेच गाडी क्रमांक 12159 अमरावती -जबलपूर एक्सप्रेस 04, 05, 09, 10 ऑगस्ट रोजी रद्द केली. गाडी क्रमांक 12160 जबलपूर -अमरावती एक्सप्रेस 05, 06, 10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द असणार आहे.

गाडी क्रमांक 22124 अजनी -पुणे हमसफर एक्सप्रेस 6 ऑगस्ट, गाडी क्रमांक 22117 पुणे -अमरावती एक्सप्रेस 7 ऑगस्ट, गाडी क्रमांक 22141 पुणे -नागपुर हमसफर 08 ऑगस्ट, गाडी क्रमांक 22118 अमरावती -पुणे एक्सप्रेस 08 ऑगस्ट, गाडी क्रमांक 22142 नागपुर – पुणे हमसफर एक्सप्रेस 9 ऑगस्ट, गाडी क्रमांक 22139 पुणे – अजनी हमसफर एक्सप्रेस 10 ऑगस्ट व गाडी क्रमांक 22140 अजनी – पुणे हमसफर एक्सप्रेसची 11 ऑगस्टला धावणारी फेरी रद्द करण्यात येणार आहे.

तसेच गाडी क्रमांक 12140 नागपुर – मुंबई एक्सप्रेस 5 ऑगस्ट रोजी नागपूर विभागात 01.45 तास नियमित केली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून देण्यात आली. दरम्यान या मेगाब्लॉकचा सर्वाधिक फटका भुसावळ विभागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसणार आहे.

Pachora | एकलव्य आदिवासी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष पदी सुधाकरभाऊ वाघ यांची निवड…

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!