राज्य

शिवरुप तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त तिर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण

Pune|शिवसंकल्प मेळाव्यात सुषमा अंधारे यांच्या हल्लाबोल

लोणी काळभोर-

साधना सहकारी बँक मा.चेअरमन, विद्यमान संचालक श्री.अनिल रतनशेठ तुपे यांचे चिरंजीव श्री.शिवरुप अनिल तुपे यांच्या वाढदिवसानिमित्त तिर्थक्षेत्र रामदरा महादेव मंदीर, वन विभाग डोंगर परिसर या ठिकाणी १० फुट उंच वटवृक्षाचे वृक्षारोपण कन्या प्रशाला लोणी काळभोर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी काळभोर, ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, वनविभाग लोणी का‌ळभोर,  यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप, राम हलमे,गणेश पातडे,दादासाहेब कोळपे,सचिन महानवर, नितीन काळभोर उपस्थित होते.

तिर्थक्षेत्र रामदरा येथे वृक्षारोपण करतांना

‘निसर्ग’ हे मानव, वन्यजीव, जलचर प्राणी, पक्षी अन् वनसंपत्ती यांना लाभलेलं मोठं वरदान आहे. या पार्श्वभूमीवर निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी आधी आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करणं गरजेचं आहे. कारण, पर्यावरणाचा समतोल बिघडणे म्हणजे मानवाच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणं होय. सध्याच्या काळात जल, वायू व ध्वनिप्रदूषणामुळे वसुंधरेचं स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. कारण, प्रदूषणामुळे पर्यावरणाचं नुकसान होत असल्याची जाणीव नसणं, हे बौद्धिक मागासलेपणाचे लक्षण आहे. पर्यावरणाच्या संवर्धनातून वसुंधरेचा बचाव करण्यासाठी जागतिक पातळीसह देशस्तरावर पर्यावरणवादी चळवळीची व्याप्ती वाढीस लागणे, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. पुढे जाऊन ती लोकचळवळ झाली, तर ते सर्व घटकांच्या दृष्टीने अधिक लाभदायक ठरेल, हे निश्चित.पृथ्वीवरील मानवजातीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन व्हावे,पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते असून, त्यात ‘वायू’ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. कारण, वायूविना मानवी जीवनाची कल्पना करणंच अशक्यप्राय आहे. शुद्ध हवा, अर्थातच प्राणवायू आपल्याला झाडांपासून मिळतो. ही झाडं पृथ्वीवरील समस्त जीवसृष्टीची संजीवनी आहे. वृक्षांमध्ये प्राणवायू पुरविण्याची तसेच वातावरणातील अशुद्ध व विषारी वायू शोषून घेण्याची क्षमता असते. तात्पर्य, वृक्ष हे जीवसृष्टीचे खर्‍या अर्थाने जीवनदाते असल्याने जुन्या वृक्षांची काळजी घेत, जास्तीत जास्त नवीन वृक्ष सातत्याने लावले पाहिजेत, त्यामुळे पाण्याचा भूगर्भात निचरा होऊन शेतकर्‍यांच्या शेतातील विहिरींना भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होऊ शकेल. शहरांमधील हाऊसिंग सोसायट्यांनी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ प्रकल्प राबवत पावसाचे पाणी अडवून पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले पाहिजे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची टंचाई भासणार नाही. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी ‘जल’ हा फॅक्टर अतिशय महत्त्वाचा असल्याने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हे अभियान राबवून पृथ्वीवरील जलसाठ्याचा वापर सुयोग्य पद्धतीने केल्यास मानवाला पाण्याची कमतरता कधीच भासणार नाही अशी  महिती ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमित जगताप यांनी दिली .

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!