तीन महिने उलटून अद्याप बेपत्ता तरुणी शोध लागत नाही म्हणून वडीलांचा उपोषणाचा पावित्रा पोलीस अधिक्षकांना दिले निवेदन.

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील १७ वर्षीय मुलगीस फुस लावुन पळवुन नेल्या बाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं.०१४७/२०२३ प्रमाणे दाखल असुन अद्याप मुलगी चा कुठल्याही प्रकारचा तपास मुलगी जिवंत आहे या बरे वाईट झाले म्हणून पोलीस यंत्रणेने केला नसल्याचे म्हणत मुलगी च्या वडीलांनी विवीध स्तरावर निवेदन दिले आहे सदर दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,मी सतिष बाबुलाल धनगर, (वय ४०) धंदा शेती, रा. लोहारा, ता. पाचोरा, जि.जळगाव दिनांक १७/०६/२०२३ रोजी दाखल गु.र.नं. ०१४७/२०२३ मध्ये तीन महिन्यांचा कालावधी उलटुन देखील योग्य तो तपास न झाल्याने व माझ्या मुलीच्या जिवीताला फुस लावून पळवुन नेणाऱ्या संशयीत याचेकडुन धोका असल्याने त्याला तात्काळ अटक करणेबाबत निवेदन देण्यात आले आहे. माझी मुलगी अल्पवयीन असुन हिला आमचे राहते घरातुन दिनांक १६/०६/२०२३ रोजी रात्री ९.३० ते दिनांक १७/०६/२०२३ च्या सकाळी ४ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावुन, आमिष दाखवुन पळवून नेलेले आहे. अशा आशयाची फिर्याद पिळगांव | हरे | पो. स्टेशनला दिनांक १७/०६/२०२३ रोजी मी दाखल केलेली आहे. दरम्यान आम्ही लोहारा गावी शोध घेतला असता अशी माहिती मिळाली की, लोहारा बस स्टॅन्डवर मोबाईल शॉपी या दुकानाचा चालक असलेला रा. जंगीपुरा, ता. जामनेर, जि. जळगांव हा देखील दिनांक १७/०६/२०२३ पासुन फरार आहे. त्यामुळे त्यानेच माझ्या मुलीला फुस लावुन पळवून नेलेले असल्याबाबत माझी पक्की खात्री झालेली आहे. सदरील संशयीत आरोपीचे आई वडील हे जंगीपुरा, ता. जामनेर येथे वास्तव्यास आहेत व त्याचा एक भाऊ सिल्वासा गुजरात राज्य येथे राहतो. सदरच्या संशयीत आरोपीस पिंपळगाव हरे पोलीस सहाय्य करत असल्याबाबत मला संशय आहे.
सदर गुन्हयाचा तपास हा पो. स्टे. पिंपळगाव हरे. येथील पोलिस उपनिरीक्षक श्री.अमोल पवार हे करीत असुन तीन महिने उलटूनही सदर गुन्हयाच्या तपासात पाहिजे तशी प्रगती दिसुन येत नाही. म्हणून सदरचा गुन्हा हा जळगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा कारण सदरच्या आरोपीने माझ्या मुलीचा घातपात केला असल्याचा मला दाट संशय आहे म्हणून वरील नमुद संशयीतांना ताब्यात घेवून कसून चौकशी करण्यात यावी व माझ्या मुलीला शक्य तितक्या लवकर माझ्या ताब्यात देण्यात यावे, अन्यथा मी माझ्या कुटुंबासह उपविभागीय अधिकारी पाचोरा यांचे कार्यालयासमोर दि.०२ ऑक्टोबर २०२३ पासुन आमरण उपोषणास बसावे लागेल व भविष्यात होणाऱ्या परीणामांची जबाबदारी सर्वस्वी पोलीस प्रशासनाची राहील या आशयाचे निवेदन सतिष बाबुलाल धनगर यांनी दिले आहे.