श्री.गो.से. हायस्कूल येथे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.
पाचोरा-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे सोमवार दि. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 वाजता 14 वर्षाखालील व 19 वर्षाखालील बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी तालुका बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष सुरज वाघ, गो. से. हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील , तालुका क्रीडा समन्वय प्रा.गिरीश पाटील , उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील , पर्यवेक्षक ए.बी. अहिरे , पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल , सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी.तडवी,पंच अभिषेक जाधव, गो. से. हायस्कूल व तालुक्यातील क्रीडा शिक्षक संजय करंदे, संजय दत्तू , एस बी मनोरे, शितल साळुंखे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वप्रथम वरील सर्व मान्यवरांचा बुके व गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. सुरज वाघ यांच्या हस्ते सोंगटी हलवून बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.मुख्याध्यापक एन.आर. पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना बुद्धिबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व स्पर्धेचे नियम अटी समजावून सांगितल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. बोरसे व आभार प्रदर्शन एम.जे. चिंचोले यांनी केले.