सिद्धीविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये आता बालकांसाठी देखील मोफत उपचार सुविधा.
पाचोरा-
पाचोरा येथील महाराणा प्रताप चौकात गेल्या अनेक वर्षांपासून “सेवा आणि समर्पण” या उदात्त हेतूने वैद्यकीय सेवेत अहोरात्र कार्यरत असलेल्या डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. सौ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील या दांम्पत्याने गोरगरीब , सर्वसामान्यांना विविध आजारां संदर्भात मोफत उपचाराचे अत्याधुनिक वैद्यकीय दालन उपलब्ध करून दिले असून आता बालकांवर देखील मोफत उपचाराची सुविधा सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दिली जात आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य व प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नवजात बाळावर मोफत उपचार करण्यात येतो का? विषयी अधिक माहिती देतांना बालरोग तज्ञ डॉ. सौ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांनी ही सुविधा वरील योजने अंतर्गत सुसज्ज शिशुरोग विभाग, काचेच्या पेट्या, वॉर्मर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर ,काचेच्या पेटीतील सर्व सुविधां सह मोफत उपचाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बालकांच्या न्युमोनिया, बालदमा, मिरगीचे झटके, तापात येणारी मिरगी, मेंदू ज्वर, जलसंसर्ग, सर्पदंश, रक्तस्राव, विषबाधा व डेंग्यू यासारख्या आजारांवर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा सर्व अत्याधुनिक सुविधा सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असून या विविध योजनां अंतर्गत मोफत उपचार सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सौ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांनी केले आहे.