आर्वे शिवारात गुरचरण जमिनीवर शिक्षण संस्थेचे बेकायदेशीर बांधकाम
तहसीलदारांना निवेदन; गुन्हे दाखल करण्याची मागणी..

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील लोहारी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आर्वे शिवारातील शासकीय गुरचरण जमिनीवर तुळजाई शिक्षण संस्थेने शाळेचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे. शासनाच्या खुल्या भूखंडावर अवैधरित्या बांधकाम करणाऱ्या तुळजाई शिक्षण संस्थेच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सामाजिक कार्यकर्ते व बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम पाटील यांनी पाचोरा तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील लोहारी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आर्वे शिवारातील शासनाच्या गुरचरण भूखंडावर तुळजाई शिक्षण संस्थेने बेकायदेशीर खासगी शाळेचे बांधकाम सुरु केले आहे. आर्वे गावाची लोकसंख्या विचारात घेता त्या गावात खासगी शाळेस कोणतीही आवश्यक ती बांधकाम परवानगी नसतांना तुळजाई शिक्षण संस्था शासनाचा खुला भूखंड हडप करण्याचा इराद्याने या ठिकाणी खासगी शाळेने बांधकाम झपाट्याने सुरू केले आहे, असेही या निवेदनात नमूद केले आहे.
तुळजाई शिक्षण संस्थेला शासनाच्या गुरचरण जमिनीवर सुरू असलेल्या बांधकामप्रकरणी नोटीस बजावली असून, त्यावर पाचोरा तहसीलदारांकडे सुनावणी सुरू आहे.अशी माहिती
गणेश नन्नवरे, ग्रामसेवक,लोहारी, ता.पाचोरा जि.जळगांव यांनी दिली आहे.





