पाचोरा!संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना डिबीटी करण्याचे आवाहन..
पाचोरा-
पाचोरा तालुक्यात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 17,000 हजार असुन डिबीटी(DBT)साठी तहसीलदार कार्यालयात फक्त 4,000 हजार लाभार्थ्यांनी कागद पत्रे जमा केली आहेत. या बाबतची माहिती संजय गांधी निराधार विभाग पाचोरा यांनी दिली आहे.
पाचोरा तालुक्यातील संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी डिबीटी (DBT) तात्काळ करून घ्यावे,डिबीटी DBT झाल्यावरच बँक खात्यात 1500 रुपये जमा होतील, अन्यथा जमा होण्यास अडचण निर्माण होईल,असे आवाहन करण्यात आले.
डिबीटी कसे कराल?
आधारकार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे,बँक खात्याला आधार कार्ड, मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे.NCPI ला आधार सेंडीग असणे आवश्यक आहे.
तहसील कार्यालय देण्याचे कागदपत्रे
NCPI ची एक प्रत आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, ओटीपी साठी मोबाईल सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.तालुक्यातील संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी डिबीटी (DBT) तात्काळ करून घ्यावे