महानुभाव पंथ, पुजारी भोपे समाजाच्या वतीने नगरपरिषद, तहसीलदार, प्रांताधिकारी यांना निवेदन; दफन भूमीची जागा शासन दरबारी लावण्याची केली मागणी.
पाचोरा-
पाचोरा येथील सर्व महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधवांनी आज दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी, परधाडे रस्त्यावरील,वाटर प्लॉट जवळील दफन भुमीची जागा सरकारी दप्तरात नोंद करण्यात यावी,याकरीता नगरपरिषद, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सदर निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,१) आम्ही पाचोरा येथे सर्व महानुभाव पुजारी भोपे, उपदेशी समाज बांधव बहुसंख्येने वास्तव्य करीत आहोत. तसेच आम्ही पिंढ्यापिढ्यांपासून आमच्या समाजाच्या रुढी, परंपरा तसेच रितीरिवाजा प्रमाणे समाजातील कोणतेही धार्मीक, सामाजिक कार्यक्रम, उपक्रम करीत असतो. जसे की, लग्नसमारंभ, अंत्यविधी यासारखे सर्व विधी समाजाच्या रुढी, परंपरा व रितीरिवाजाप्रमाणे होत असतात.२) आमच्या समाजात अंत्यविधी हा दफन करुनच केला जात असतो. पाचोरा येथील नगरपरिषदेच्या अधिनस्त असलेली परधाडे रस्त्यावरील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं. ३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर या जागेत आम्ही पिंढ्यापिढ्यांपासून आमच्या समाजाच्या रुढी व परंपरेनुसार समाजातील व्यक्तींचा अंत्यविधी करीत आलेलो आहोत. गेल्या काही वर्षापुर्वी सदर जागेच्या काही भागामध्ये नगरपरीषदेने वॉटर प्युरिफायर प्लॉट उभारलेला आहे. परंतू उर्वरीत जागेत आमची दफनभूमी आहे.३) पाचोरा येथील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं.३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर यातील नगरपरिषदेने उभारलेला वॉटर प्युरिफायर प्लॉट सोडून उर्वरीत जागा ही आमच्या दफनभूमीची आहे. सदर जागेत पुर्वीपासुन आम्ही आमच्या समाजातील अंत्यविधी हा बऱ्याच पिढींपासून करीत आलेलो आहोत. आमच्या समाजातील लोक, नातेवाईक, आजोबा, पंजोबा यांचे अंत्यविधी या ठिकाणीच करण्यात आलेले आहेत. परंतू याठिकाणी संपुर्ण मोकळी जागा असुन, काही भागात नगरपरीषदेचा कचरा डेपो देखील आहे. त्यामुळे स्मशानभूमी ही स्मशानभुमी वाटत नसुन सर्व जागेची नासधूस झालेली आहे. कचरा डेपोतील सर्व कचरा देखील दफन केलेल्या प्रेतावर जाऊन बसतो. त्यामुळे सर्व समाजाच्या धार्मीक, सामाजीक भावना दुखावल्या जात आहेत. सदरची जागा कागदोपत्री शासन दप्तरी आमच्या समाजाच्या स्मशानभूमीच्या नावे नाही. त्याचप्रमाणे अंत्यविधी करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. जसे की, स्मशानभूमी पर्यंत पोहोच रस्ता नाही, जमीन सपाटीकरण नाही, पाण्याची सोय नाही, कोणत्याही प्रकारचा विद्युत पुरवठा नाही, ऊन, पाऊस यांपासून संरक्षण होण्यासाठी कोणतेही शेडचे बांधकाम नाही, दफनभूमीस सरंक्षण भिंत नाही.
४) तरी सदर निवेदनाद्वारे आपणांस सर्व महानुभाव पुजारी, उपदेशी समाज बांधवांच्या स्मशानभुमी करीता मागणी पुढीलप्रमाणे :-
१) पाचोरा येथील नगरपरिषद हद्दीतील सर्व्हे नं.३०५/२ क्षेत्र ३.७६ हेक्टर यातील नगरपरिषदेने उभारलेला वॉटर प्युरिफायर प्लॉट सोडून उर्वरीत जागेची मोजणी करुन तशा हद्दी-खुणा गाडून सदरची जागा ही सर्व महानुभाव पुजारी, उपदेशी समाज बांधवांच्या स्मशानभुमीच्या नावे शासन दप्तरी करण्यात यावी.
२) सदर स्मशानभूमी पर्यंत पोहोच रस्ता करुन मिळणे.
३) दफन भूमीमध्ये अंत्यकर्म करण्यासाठी आलेल्यांना बसण्याची तात्पुरती सोय होण्यासाठी अनुरुप शेडची व्यवस्था करणे,
४) दफन भूमीसाठी आवश्यकतेनुसार कुंपण वा भिंती घालून जागेची सुरक्षितता करून मिळणे.
५) दफनभूमी मध्ये विद्युत खांब नाहीत, त्याठिकाणी खांब उभारुन दफन भूमीतील विद्युत खांबावर सीएफएल अथवा ट्युबलाईट तसेच दफन भूमीकडे जाणान्या रस्त्यावर पथदिव्याची व्यवस्था करणे.
६) दफन भूमीत येणाऱ्या लोकांना अंत्य विधीसाठी पाण्याची सोय उपलब्ध करुन मिळणेसाठी स्मशान भूमीपर्यंत नळ घेवुन पाण्याचा हौद बांधण्यात यावा.
७) सदर स्मशानभूमीची व तेथील सुविधांची देखभाल व दुरुस्ती पाचोरा नगरपरीषदतफे शासकीय योजनेअंतर्गत करुन मिळावी.
तरी माननीय महोदयांना सर्व महानुभाव पुजारी, उपदेशी समाज बांधवांतर्फे विनंती की, शासकीय नियम व योजनांद्वारे वरील सर्व मागण्या शासन स्तरावर पुर्ण करुन मिळाव्यात.या आशयाचे निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी, महानुभाव पंथ पुजारी समाजाचे तालुका अध्यक्ष,मिलींद पुजारी, अँड सुदर्शन पुजारी, पो.नि.दिपक पुजारी, विलासराव बिडकर, प्रशांत पुजारी,चुडामन पुजारी, गोविंद पुजारी,अजय पुजारी, प्रकाश पुजारी,भिका पुजारी, तुषार पुजारी,विजय पुजारी यांचेसह महानुभाव पंथीय व उपदेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.