क्राईमराज्य

रायगड मध्ये पोलीस भरती लेखी परीक्षा, कॉपीसाठी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर;६ उमेदवारांना घेतले ताब्यात.


रायगड-

रायगड पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या झालेल्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे. या प्रकरणी ६ उमेदवारांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे ६ उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून बसले होते.रायगड पोलिसांनी लेखी परीक्षेच्या दरम्यान विशेष काळजी घेतली होती.

कॉपी रोखण्यासाठी तपासणीसाठी हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व ६ जण पुरुष उमेदवार असून त्यातील ४ जण बीडमधील तर छत्रपती संभाजीनगर व जालना येथील प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे. या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर डीव्हाइस वरून जे कुणी त्यांच्या संपर्कात होते त्यांचाही शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली.रायगड पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या ३९१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया जुलै महिन्यापासून सुरू आहे. कागदपत्र पडताळणी, शारीरिक क्षमता चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात आले होते.अलिबाग आणि पेण इथ ११ केंद्रावर लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला ४ हजार ७४७ उमेदवार बसले होते.

परीक्षा निर्भयपणे, शांततामय, उत्स्फूर्त वातावरणात पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रावर व केंद्राबाहेरील परिसरात १ पोलीस अधीक्षक, १ अपर पोलीस अधीक्षक, १०० पोलीस अधिकारी ५७६ अंमलदार असे एकुण ६७७ पोलीस अधिकारी व अंमलदार बंदोबस्त ठेवण्यात आला होता .

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!