आरोग्य सेवा पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न..
पाचोरा-
आरोग्य सेवा पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 11ऑगस्ट 2024 रोजी अल्पबचत भवन पाचोरा येथे संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री राजाराम सोनार होते. सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले.
त्यानंतर संस्थेच्या दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष उमेश महाजन यांनी प्रास्ताविक केले. सभेच्या अजेंड्यावरील विषयांचे वाचन श्रीकांत मराठे यांनी केले. त्यानंतर “चला आरोग्य जपूया” या विषयावर सुप्रसिद्ध व्याख्याते व लेखक प्राध्यापक सचिन देवरे यांचे मुद्देसूद व खुशखुशीत व्याख्यान झाले. यावेळी उपस्थित प्रमुख अतिथी व सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. तसेच पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचा व निवृत्त सभासदांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री टाक साहेब यांनी संस्थेला पाच हजार रुपये देणगी देऊन संस्थेचे सभासदत्व स्वीकारले. नंतर संस्थेच्या सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार जांभूळ वृक्षाची रोपे व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री अतुल पाटील (सहाय्यक आयुक्त , मत्स्यसंवर्धन ,जळगाव) , भाजपाचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी अमोल भाऊ शिंदे , माजी पंचायत समिती सभापती बन्सीलाल पाटील , प्रदीप पाटील , वैद्यकीय अधिकारी डॉ.शेळके उपस्थित होते. यावेळी अमोल भाऊ शिंदे , वैद्यकीय अधीक्षक टाक साहेब , डॉ.शेळके , संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राजाराम सोनार यांनी मनोगत व्यक्त केले. सभेला रमेश चौधरी , गजानन काकडे ,दीपक दीक्षित ,भरत गोसावी , दगडू शिरसाठ , पांडुरंग पाटील , श्रीकांत मराठे , राजेंद्र महाजन , आनंदा पाटील , रुपेश पगार , सौ.आशा दराडे ( व्हाईस चेअरमन )सर्व संचालक मंडळ व सौ अर्चना पाटील (सचिव )यावेळी उपस्थित होते. यावेळी सदस्यांना मीटिंग भत्ता व डिव्हीडंट वाटप करण्यात आले. रमेश चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेचे सूत्रसंचालन नरेंद्र पाटील यांनी केले. स्वादिष्ट भोजनाने सभेची सांगता झाली.