मध्य प्रदेश येथील सराईत गुन्हेगारा कडून,दोन गावठी पिस्तुल दोन जिवंत काडतूस जप्त.
रावेर-
दिनांक 10/08/2024 रोजी मा. पोलीस निरीक्षक श्री. डॉ. विशाल जयस्वाल यांनी त्यांच्या कॅबीनमध्ये पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोहेकों रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकों विकार शेख अशांना कॅबिनमध्ये बोलावून कळविले, मिळालेल्या गोपनिय बातमी प्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील हॉटेल जय पॅलेस समोर एक इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तुल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी वर प्रमाणे पोलीस स्टॉफ रवाना होवून संशयीत इसमास सापळा रचून ताब्यात घेतले सदर इसमास ताब्यात घेवून त्याची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या जवळ गावठी बनावटीच्या 2 रिव्हाल्वर व 2 जिवंत काडतूस असा एकुण 51,000/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यावरुन नामे तोफसिंग चतरसिंग चावला वय 27 वर्षे रा.धसली ता. झिरण्या जि. खरगोण (मध्य प्रदेश) यास ताब्यात घेवुन त्यास रावेर पोलीस स्टेशन येथे पुढील कार्यवाही कामी घेवून आलो पोकों/ 2059 महेश मोगरे यांच्या फिर्याद वरुन रावेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुरन 379/2024 भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3,25 प्रमाणे सहकलम मुंबई पोलीस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे व भारतीय न्यास संहिता कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील हे करीत आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक डॉ. श्री. महेश्वर रेड्डी सो, मा.श्री अशोक नखाते साहेब, अपर पोलीस अधिक्षक जळगांव, श्रीमती अन्नपूर्णा सिंह मॅडम, सहाय्यक पोलीस अधिक्षक फैजपुर, पोलीस निरीक्षक डॉ. श्री विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उप निरीक्षक तुषार पाटील, पोहेकों रविंद्र वंजारी, सचिन घुगे, प्रमोद पाटील, विशाल पाटील, महेश मोगरे, पोकों विकार शेख, पोकी अतुल गाडीलोहार यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.