एम एम महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व अंकुर नियतकालिक प्रकाशन सोहळा उत्साहात.
पाचोरा-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेने चालवलेल्या एस एस एम एम महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023 24 मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व मार्गदर्शन प्रांत अधिकारी श्री भूषण अहिरे तर अंकुर नियतकालिक प्रकाशन डॉ मुकुंद करंबेळकर रंग गंध कलासक्त न्यास चाळीसगाव व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संमोहनतज्ञ व्याख्याते डॉ शैलेंद्र गायकवाड नाशिक यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जिल्हा दूध संघाचे संचालक माजी आमदार श्री दिलीप वाघ होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन दीप प्रज्वलन करून सेमिनार हॉलचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गुणवंत विद्यार्थी सिद्धम विसपुते कुमारी रितू सिसोदे यांनी आपल्या मनोगततून संस्थे पदाधिकाऱ्यां गुणगौरव करून व संस्थेविषयी गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली याप्रसंगी डॉ मुकुंद करंबेळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थी विद्यार्थिनींनी जोडीदाराची निवड कशी करावी जोडीदार कसा असला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करताना म्हणाले की मुलगी ही बहु दुधी आणि आखूड सिंगी असली पाहिजे तर मुलगा हा सकारात्मक विचाराचा सत्व जपणारा आदर करणारा प्रामाणिक आणि समजूतदार असला पाहिजे मी कसा आहे मी कशी आहे याचंआत्मचिंतन प्रत्येकाने केले तर आपले भावी आयुष्य सुखाचं जाईल असा मौलिक सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला त्यांनी या मुलींना सारं काही कळतं ही कविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संमोहन तज्ञ डॉ शैलेंद्र गायकवाड म्हणाले की विद्यार्थ्यांनी उथळ मनाचे राहू नये आपल्याजवळ असलेल्या क्षमतेचा योग्य वापर करावा ज्ञान तेथे मान आहे विवेक शाबूत ठेवा साधे जीवन जगा आपली ओळख स्वतः निर्माण करा आपला वारसा जपा प्रथम आपण माणूस आहोत याचे भान असू द्या सर्वांशी प्रेमाने माणुसकीने वागा सकारात्मक रहा प्रचंड मेहनत करा यश निश्चित येईल असा मौलिक सल्ला त्यांनी दिला प्रांताधिकारी भूषण अहिरे माजी आमदार दिलीप वाघ यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा याप्रसंगी प्रा योगेश पुरी यांनी पीएचडी संपादन केल्याबद्दल आणि रजनीश गायकवाड यांना आयर्न मॅन पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन संजय वाघ व्हाईस चेअरमन व्ही टी जोशी कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्राध्यापक सुभाष तोतला ज्येष्ठ संचालक दगाजी वाघ सतीश चौधरी योगेश पाटील खलील देशमुख दुष्यंत रावल अर्जुन दास पंजाबी डॉ जयंतराव पाटील डॉ पी एन पाटील प्रकाश पाटील प्रा राजेंद्र चिंचोले डॉ बी एन पाटील प्राचार्य डॉ शिरीष पाटील प्राचार्य डॉ एन एन गायकवाड उप प्राचार्य डॉ वासुदेव वले उपप्राचार्य डॉ जे व्ही पाटील उपप्राचार्य जे बी पाटील पर्यवेक्षक प्रा एस एस पाटील रजनीश गायकवाड उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ वासुदेव वले यांनी करून दिला प्रास्ताविक प्राचार्य डॉ शिरीष पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अतुल सूर्यवंशी डॉ माणिक पाटील डॉ सौ सुनिता मांडोळे प्राध्यापिका वैशाली बोरकर प्राध्यापिका क्रांती सोनवणे आभार उप प्राचार्य डॉ जी व्ही पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.