स्वातंत्र्य दिनानिमित्त कृषी अधिकारी तालुका तंत्रज्ञान, व्यवस्थापन यांच्या वतीने रानभाजी महोत्सव
पाचोरा-
१५ ऑगस्ट ७८व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, पाचोरा तालुक्यात तालुका कृषि अधिकारी पाचोरा व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन, आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका फळरोपवाटीका, पाचोरा येथे “रानभाजी महोत्सव” आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार मा.किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते फित कापून रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या, औषधी व सुगंधी वनस्पती चे एकून १२५ नमुन्यांचे नियोजन करण्यात आले होते.दिवसेंदिवस ढासळत चाललेला नैसर्गिक समतोल लक्षात घेता पूर्वापार चालत आलेल्या रूढीपरंपरा कायम राखत त्यांचे पुढील पिढीला वनौषधींची ओळख, त्याचे महत्व व उपयोग यांची कायम ओळख राहावी,त्यातूनच रानभाज्या, औषधी व सुगंधी वनस्पतींचे जतन मानवांकडून व्हावेत या उद्देशातून सदरील रानभाजी महोत्सवाचे महत्व प्रास्ताविकात विषद करत रमेश जाधव , उपविभागीय कृषि अधिकारी , पाचोरा यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले, तर सदरील स्तुत्य उपक्रमांतून रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून परंपरागत वारसा जतन करण्याचे काम कृषि विभागाकडून केले जात असल्याबद्दल मा.आमदार यांनी समाधान व्यक्त केले.तसेच खरीप हंगाम २०२३ मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रती हेक्टरी रू.५००० या विशेष मदत जलत गतीने व्हावेत म्हणून पर्यायी मनुष्य बळ कसे उपलब्ध करता येईल व निर्माण झालेल्या काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी राज्याचे मा.कृषि मंत्री यांना कळविण्यात येवून तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत उपस्थितांना सांगितले.
तसेच सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्यागाअंतर्गत अनुदानित तेलघाण्याचे स्टाॅल ला भेट देत,त्यांनी उद्योगाची माहिती घेतली.तसेच त्यावेळेस पाचोरा तालुक्यातील तालुकास्तरीय समितीने मंजूर केलेले गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत सानुग्रह अनुदान एकूण १७ लाभार्थ्यांना प्रमाणपत्र हस्तांतरित केले.यावेळेस कृषि विभागातील सर्व कृषि सहाय्यक ,पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उमेश पाटील, कृषि सहाय्यक यांनी केले तर समारोपानंतर आभारप्रदर्शन श्री, सचिन भैरव , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले.