पुनगांव ग्रामपंचायतीच्या वतीने गाव रत्न शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न..

पाचोरा-
पाचोरा तालुक्यातील पुनगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुनिता चिंतामण पाटील यांच्या संकल्पनेतून गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांना ,उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना गाव रत्न शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. मागील वर्षी पासून सुरू झालेला हा उपक्रम स्तुत्य उपक्रम असुन तो उपक्रम म्हणजे शिक्षकांच्या कार्याची दखल घेत केलेला सन्मान आहे पुनगांव ग्रामपंचायतीच्या वतीने गाव रत्न शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करून शिक्षकांना सन्मानित करणारी पुनगांव ग्रामपंचायत ही पाचोरा तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याचे पुरस्कार वितरण सोहळ्यात पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या आपल्या मनोगतात सांगितले.

या २०२५/२६ वर्षाचा गाव रत्न शिक्षक पुरस्कार हा विभागून देण्यात आला आहे त्यात पुनगांव गृप ग्रामपंचायत हद्दीतील मांडकी खुर्द येथील नवीन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव किसनराव सुरवाडे यांना आणि दुसरी नवीन जि प शाळा राजीव गांधी नगर पुनगांव शिवार येथील सौ. ज्योत्स्ना पंढरीनाथ चित्ते यांना देण्यात आला. या वेळी दोन्ही शिक्षकांचा कुटूंबातील सदस्या सह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच सौ सुनिता चिंतामण पाटील व माजी सरपंच रविंद्र माधव गुजर हे होते. तसेच गावरत्न शिक्षक पुरस्कार आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.या वेळी गटशिक्षणाधिकारी समाधान पाटील, केंद्र प्रमुख अभिजित खैरनार,उपसरपंच मनोज मोरे, व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक पोलीस पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन व संचालक, दुध डेअरी चे चेअरमन व संचालक, सर्व माजी सरपंच व उपसरपंच सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी शिक्षणप्रेमी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





