क्राईमजळगाव जिल्हा

चहाचे भांड्याचे धुतलेले पाणी अंगावर फेकल्याचा कारणावरून केली मारहाण; पाचोरा पोलीसांत गुन्हा दाखल.


पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील भिकन पाटील यांचे सुनेने चहाचे भांडे धुतले व ते पाणी घरासमोरील देवेंद्र यांचे अंगणात फेकले या शुल्लक गोष्टीचा राग देवेंद्र याला आल्याने त्याने शिवीगाळ करत,धमक्या देत हातात लोखडी पाईप घेवुन भिकन पाटील यांचे घरी दिनांक २५ मार्च सोमवार रोजी रात्री ०८:३० वाजेच्या सुमारास आला व विनापरवानगीने घरात घुसला व भिकन पाटील यांचे पत्नीला चापटा बुक्यांनी तोंडावर छातीवर हातावर मारहाण करत, हातातील लोखंडी पाईपने भिकन पाटील यांचे डोक्यावर कपाळाचे वरचे भागात मारला त्यामुळे डोके फुटुन रक्तस्राव झाला.
सदरच्या मारहाणीत भिकन पाटील यांच्या पत्नीच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल, व मणी असलेली पोत तुटुन कोठेतरी गहाळ झाली असुन त्यात भिकन पाटील यांचे सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपये पर्यंतचे नुकसान झाले आहे अशी तक्रारी फिर्याद भिकन पाटील यांनी पाचोरा पोलीसात दिल्यावरून संशयित मारेकरी विरोधात भा.द.वी.कलम ३२४,४५२,३२३,५०४,५०६,४२७ प्रमाणे पाचोरा पोलीसात दिनांक 26 मार्च मंगळवार रोजी विविध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514/8308221432

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!