आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेवर आदिवासी अधिकारी राजेंद्र भारुड यांची नियुक्ती करण्याची एकलव्य संघटनेने निवेदनाद्वारे केली मागणी..

पाचोरा-
आदिवासी समाजाच्या मूलभूत अधिकार व हक्कांमध्ये कोणीही हस्तक्षेप अथवा राजकारण करू नये. व आदिवासी प्रशिक्षण व संशोधन संस्थेवर सादिवासी अधिकारी म्हणून राजेंद्र भारूड साहेब हेच अथवा त्यांच्या जागेवर खऱ्या आदिवासी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात करण्यात यावी या आशयाचे निवेदन आज दिनांक २० ऑगस्ट २०२४ रोजी तहसीलदार यांना देण्यात आले.
सदरच्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जो आदिवासी समाजाविरोधात जी भूमिका घेतलेली आहे. त्या भूमिकेचा. आम्ही जाहीर निषेध करतो कारण आदिवासी विभागातील जात पडताळणी कार्यालय व आदिवासी विभागातील सर्व कार्यालय येथे आदिवासी अधिकारीच हवे कारण ते कार्यालय आदिवासींच्या विकासासाठी असून राजकारण करण्यासाठी नाही. तसेच नंदुरबार व धुळे येथील जात पडताळणी समिती ही कोणत्याही परिस्थितीत जळगाव येथे आणू नये,व आहे तिथेच नियमित करावे व जळगाव येथे कोणत्याही स्वरूपाची पडताळणी समिती अथवा प्रतिनिधी पाठवू नये, कारण, ते कार्यालय अथवा प्रतिनिधी जळगाव येथे पाठवल्यावर त्या कार्यालयाचा दुरुपयोग जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नाही केल्यास एकलव्य संघटना व सर्व आदिवासी संघटना महाराष्ट्राभर तीव्र आंदोलन करणार असून यांची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी. या आशयाचे निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय सोनवणे, युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र सोनवणे,राजु भिल,नाना भिल, लक्ष्मण भिल, आण्णा भिल यांच्या सह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.