कोपरगाव चे भावी आमदार शिवाजीराव कवडे (पाटील) जाणार मनोज जरांगे यांच्या भेटीला
कोपरगाव-
कोपरगाव विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी कॅलिफोर्निया विकसीत तालुका म्हणून ओळखला जात होता परंतु काही काळापासून राजकीय थैमान सुरू झाल्याने कोपरगाव विधानसभा मतदारसंघ पुन्हा विकासापासून दूर होत गेला शासन सरकार मतदारसंघात मतदारांना महत्वाच्या सुख सोयी उपलब्ध करून जास्तीत जास्त निधी मंजूर करून त्या निधीची अंमलबजावणी न करता फक्त मंजुर निधीचा बोर्ड, उद्घाटन करण्यात राजकीय नेते तरबेज असून प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी न करता कोपरगाव विधानसभा मतदारसंघ आहे तसाच दिसत आहे.
मतदारसंघात मतदारांच्या घरापर्यंत जाण्यासाठी सोईचा रस्ता नाही खेड्यात गावात नागरीक वर्गात दळणवळण साठी डांबरी रोड आवश्यक आहे परंतु राजकीय लोकसेवक हे फक्त कुठे मुरुम, खडीकरण एवढं च काम करतात मंजूर होऊन आलेला निधी व त्या निधीचे झालेले कामाचा एक ही फोटो किंवा बोर्ड दिसत नाही, फक्त निधी मंजूर करणे काम माञ शुन्य म्हणून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात विकास म्हणावं असा होत नाही.या मध्ये मतदार हा कायम स्वरुपी राजकीय दहशती खालीच आहे मुलांच्या शिक्षणासाठी योग्य ती सवलत पाहीजेत त्या पासुन सुद्धा गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी वंचित रहावे लागत आहे.असे किती दिवस या प्रसंगाचा सामना मतदारांना करावा लागणार आहे.हा एक मतदारसंघात मतदारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न या राजकीय मैफलीत बघावयास मिळत आहे.या पुढे मतदारसंघात मतदारांनी समाजातील तिसरं नेतृत्व निवड करुन आज पर्यंत झालेला अन्याय नक्कीच दुर होऊन कोपरगाव विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा कॅलिफोर्निया विकसीत तालुका म्हणून पाहायचं असेल तर ,दोन पाडा समाजातुन एक निवडा म्हणजे कोपरगाव तालुका पुन्हा मोकळा श्वास घेऊन लोकशाहीत आणता येईल समाजातुन मतदारांनी जागृत होणं आवश्यक आहे कोणत्याही आमीषाला किंवा भुलथापांना बळी न पडता मतदारसंघात मतदारांनी एकनिष्ठ होऊन तिसरं नेतृत्व मान्य करावे म्हणजे राजकीय दादागिरी संपुष्टात येईल मराठा आरक्षणावर एकही नेता आवाज उठवत नाही मग यांना मतदान कशासाठी करायचे हे मतदारांनी लक्षात घेणं आवश्यक आहे.”अभी नही तो कभी नही”आता हवा फक्त बदल कोपरगाव विधानसभा मतदारसंघात फक्त विकास म्हणून आपण स्वतःदोन वेळा आमदार पदाची निवडणूक लढवली आहे म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाऊन कोपरगाव ची हकीकत सांगुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एकनिष्ठ उमेदवार म्हणून काम करणार असुन “पारदर्शकता”नुसार स्वच्छ प्रतीचं काम पुर्ण करण्यासाठी हि उमेदवारी मागणार आहे.आर्थिक बाजू कमी असलीतरी बुद्धी वापरून गनिमी कावा महत्वाचे ठरणार आहे म्हणून आपण सामाजिक कार्याची ओळख म्हणून मनोज जरागे यांच्या भेटीला जाणार असल्याबाबतची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे साठी शिवाजी कवडे पाटील यांनी दिली आहे.