नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे येथे अंतराळ दिन साजरा..
नवी मुंबई-
नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 113 महापे ,नवी मुंबई येथे महानगरपालिकेचे शिक्षण उपायुक्त संघरत्ना खिल्लारे आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेने 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनाचे महत्त्व आपल्या भाषणातून व्यक्त केले. यानंतर शाळेतील मुख्याध्यापक दिपक बडगुजर यांनी राष्ट्रीय अंतराळ दिन याबाबत 23 ऑगस्ट 2023 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान 3 चे लेंडर आणि रोव्हर चंद्रावर यशस्वीरित्या उतरुन एक महत्वपूर्ण टप्पा गाठला . भारत चंद्रावर उतरवणारा चौथा आणि स्वतःचे दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ उतरवणारा पहिला देश प्रज्ञान रोव्हारच्या यशस्वी तैनातीनंतर सॉफ्ट लँडिंग करण्यात आले. या यशाची दखल घेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केला. अशी सखोल माहिती विद्यार्थ्यांना व्याख्यानाद्वारे सांगितली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक सारिका पाटील, महादेव तोंडे, संध्या झाकणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी मंदा पिंगळे विकी मोरे यांनी परिश्रम घेतले.