पाचोऱ्यात महाविकास आघाडीच्या वतीने काळ्या फिती लाऊन निषेध,
गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- वैशालीताई सुर्यवंशी
पाचोरा-
दिनांक 24/08/2024
बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा आज येथे महाविकास आघाडीच्या वतीने भर पावसात काळ्या फिती लाऊन निषेध करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सरकारवर कडाडून टिका केली.
बदलापूर येथील चिमुकल्यांच्या अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यानंतर मात्र आज बंद ऐवजी काळ्या फिती लाऊन या घटनेचा निषेध करावा असा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी बोलतांना केंद्र व राज्यातील सरकार हे महिलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याची टिका केली. राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याने गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. मविआच्या अन्य नेत्यांनी देखील सरकारवर टिका केली.
या निषेध आंदोलनात शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख सुनील पाटील, वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे नेते सचिनभाऊ सोमवंशी, ॲड. अमजद पठाण, इरफान मण्यार, शेख इस्माईल फकीरा. संगीताताई नेवे, प्रताप पाटील अभय पाटील, शरद पाटील तालुका प्रमुख भरतभाऊ खंडेलवाल, उद्धव भाऊ मराठे, शशी बोरसे युवासेना तालुका प्रमुख , अनिल सावंत, संदीप जैन, गजु पाटील, हरिभाऊ पाटील, राकेश सर सोनावणे, विकास वाघ, दिपक पाटील, गजानन सावंत, मनोज चौधरी, हरीश देवरे, खडूं सोनावणे,आवेश खाटीक, गफार सैययद, पप्पु जाधव, अभिषेक खंडेलवाल, नामदेव चौधरी, फकीरचंद पाटील, अनिल परदेशी, मिथुन वाघ, गौरव पाटील, नितीन खेडकर, प्रशांत पाटील, प्रवीण पाटील काँग्रेस आदी मान्यवरांसह शिवसेना-उबाठा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्ष तसेच मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.