राज्य

ज्यांनी आज बंद पुकारला आहे त्यांच्या ही काळात असे अत्याचार घडले होते,
अत्याचारांविरोधातील आकडेवारीच,राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत मांडली.



Pachora|वाघाच्या नादी लागल्यावर दात पाडल्याशिवाय राहणार नाही -माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी दिला इशारा

नागपूर-

बदलापूर प्रकरण उजेडात आल्यानंतर महाराष्ट्रात सातत्याने महिला आणि चिमुकल्यांवरील अत्याचारांच्या घटना समोर येत आहेत. फक्त लैंगिक शोषणच नव्हे तर त्यानंतर मुलींची हत्याही केली जातेय. या घटनांमध्ये वाढ का झालीय? यामागे कोणतं राजकारण आहे का? असा थेट सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. ते आज नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणी राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करून सरकारला धारेवर धरलं होतं. आंदोलकांना अटक होऊ शकते, पण आरोपीला अटक करायला वेळ का लागला? असा सवाल विचारत त्यांनी लाडकी बहीण योजनेवरूनही राज्य सरकारला फटकारलं होतं. आता त्यांनी अशा घटना वारंवार समोर का येत आहेत? यावरून संशय व्यक्त केला आहे. हा संशय व्यक्त करताना त्यांनी २०१७ पासून महाराष्ट्रातील महिला अत्याचारांविरोधातील आकडेवारीच पत्रकार परिषदेत मांडली.

“ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली त्यांच्यासाठी आणि आताच्यांसाठीही आहे. महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. मुंबईमध्ये महिला आणि मुलींना सुरक्षित वाटत नाही”, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात महिलांविरोधातील वाढता आलेख सांगितला. “बलात्कार, हुंडाबळी, विनयभंग, लैंगिक अत्याचार, अनैतिक व्यापार आणि इतर अत्याचार वाढले आहेत. २०१७ मध्ये ४३२०, २०१८ मध्ये ४९७४, २०१९ मध्ये ५४१२, २०२० मध्ये ४८४६, २०२१ मध्ये ५९५४, २०२२ मध्ये ७०८४ आणि २०२३ मध्ये ७५२१ एवढ्या बलात्कार प्रकरणांची नोंद पोलीस ठाण्यात आहेत. महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. नोंद न करता आलेले गुन्हे यापेक्षा जास्त असतील. नॅशनल क्राइम ब्युरोच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशखालोखाल महाराष्ट्रात महिलांविरोधातील गुन्हे समोर आले आहेत”, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.

रोजच्या अत्याचारांच्या घटनांमागे राजकारण?

“आता जे रोज प्रकरण येतायत, ते तासाला यायला पाहिजे ना. महाराष्ट्रात प्रत्येक पोलीस ठाण्यात किती गुन्हे दाखल होतायत आणि मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की इतके दिवस दाखवले जात नव्हते. बदलापूरचं प्रकरण अत्यंत दुर्दैवी. त्याला ठेचलंच पाहिजे. याचं कारण, आपल्याकडे कठोर शासन, कठोर कायदा होत नाही. निर्भया प्रकरणातील आरोपी कळला, कसा बलात्कार झाला हेही कळलं. पण फाशी किती वर्षांनी झाली? एवढा जर उशीर एका केसला लागत असेल तर त्याचं काय करायचं? प्रश्न असा आहे की ज्यांनी आज बंद पुकारला आहे त्यांच्या ही काळात असे अत्याचार घडले होते. आणि आजही आहेत. आता जे रोजच्या रोज वर्तमानपत्रात सुरू आहे, आज इथे अत्याचार, उद्या तिथे अत्याचार… त्यामागे राजकारण आहे का? येणाऱ्या निवडणुका आहेत का?” असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

“आपल्याला विषय संपवायचा आहे. या गोष्टी महाराष्ट्रात होऊ नये, हा विषय आहे. निवडणुका आल्या की सरकारला बदनाम करा, या दृष्टीकोनातून. पण यांच्याही काळात गुन्हे होत होते”, असं म्हणत त्यांनी विरोधकांवरही टीका केली.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!