जळगाव जिल्हा

महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कायदेशीर कारवाई करा चोपडा तहसिलदारांना मानव विकास पत्रकार संघ तर्फे निवेदन…

Pachora|जरी तिचा बाप असला, माझा राजकीय बाप आहे-आमदार किशोर आप्पा पाटील



चोपडा-

मानव विकास पत्रकार संघ चोपडा यांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून त्यात कलकत्ता येथील दि.०९/०८/२०२४.रोजी.आर.जी.मेडीकल कॉलेज मधील अत्याचाराचा घटनेबाबत संबंधित दोषींना त्वरीत फाशी द्या व बदलापूर व चोपडा,अमळनेर,छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बालिकांवरील अमानुष घटनेचा आरोपीस फाशीची शिक्षा देवून महाराष्ट्रातील महिला व मुली यांच्यावरील अत्याचारात सहभागी असलेल्या दोषींवर कडक कारवाई करा.शाळा व कॉलेजांमध्ये सि.सि.टी.व्ही कँमेरे बसवा.महिला अत्याचाराच्या घटनेत महाराष्ट्रात मोठ्‌या प्रमाणात वाढ होत असून त्यासाठी कडक कायदेशीर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.तरी बदलापूर घटनेतील लैंगीक अत्याचार करणाऱ्या नराधमास व कलकत्ता येथील बलात्कार व जबर मारहाण करुन हत्या करण्यात आलेल्या घटनेतील नराधमांवर अतिजलदगतीने न्यायालयात खटला चालवून दोषीना फाशी ची शिक्षा द्या.देशासह महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटना त्वरीत थांबवा व महिलांची सुरक्षा बाबत उपाय योजना करा.तसेच नुकत्याच चोपडा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा‌ऱ्या आरोपीवर देखील त्वरीत कायदेशीर कारवाई करा.महिला व बालिका यांना सुरक्षितेची हमी द्या त्यासाठी हे निवेदन देत आहोत.अशा आशयाचे निवेदन चोपडा तहसिलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना देण्यात आले.निवेदन देते वेळी हेमकांत गायकवाड मानव विकास पत्रकार संघ जिल्हा सचिव,समाधान कोळी जिल्हा संघटक,वसीम खाटीक प्रदेश अध्यक्ष, रवींद्र कोळी राष्ट्रीय सदस्य,दिलीप पाटील विभागीय अध्यक्ष,शेख मोहसीन शेख रऊफ धुळे जिल्हा संघटक,बिलाल शेख तालुका प्रसिद्धी प्रमुख,सुनिल पावरा तालुकाध्यक्ष, रविद्र कोळी चोपडा तालुकाध्यक्ष,मिलिंद वाणी कार्याध्यक्ष,गजानन कोळी सदस्य,भिकन कोळी सदस्य,पवन कोळी सदस्य, जाकीर अली महमूद सदस्य,निजाम कुरेशी सदस्य,लीलाधर बाविस्कर सदस्य,भूषण बाविस्कर सदस्य आदी उपस्थित होते.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!