गो.से.हायस्कूल कर्मचारी पतपेढीच्या अध्यक्षपदी श्री.ए. बी.अहिरे व उपाध्यक्षपदी श्री. संजय करंदे यांची निवड
पाचोरा-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचालित गो.से. हायस्कूल पाचोरा येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या अध्यक्षपदी पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे सर व उपाध्यक्षपदी शाळेचे क्रीडा प्रमुख श्री.संजय करंदे सर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या नियुक्तीनंतर पतपेढीच्या मा.अध्यक्षा सौ.पी.एम. वाघ मॅडम यांच्या हस्ते व सचिव श्री.आर्. एल.पाटील सर यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.त्यांच्या या नियुक्ती बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.भाऊसो.श्री. दिलीप वाघ चेअरमन मा. नानासो.श्री. संजय वाघ,मानद सचिव मा.दादासो ऍड.श्री. महेश देशमुख, व्हा.चेअरमन मा.नानासो. श्री.व्ही.टी.जोशी,शालेय समितीचे चेअरमन मा.दादासो.श्री.खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन मा.अण्णासाहेब वासुदेव महाजन,शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर. ठाकरे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.