पत्रकार संघाच्या अधिवेशनात राकेश सुतार सन्मानित..
पाचोरा-
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील खान्देश विभागीय अधिवेशनात खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाला नावलौकिक करून दिल्याबद्दल राकेश सुतार यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे , राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोरजी भाऊ रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा यांच्या उपस्थिती मधे खान्देश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी संघटनेचे पदाधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. व खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाचे नावलौकीक मिळवून दिल्याबाबत या अधिवेशनात खान्देशी विभागीय संपर्कप्रमुख राकेश सुतार यांना या कार्याबद्दल पाचोरा भडगाव विधानसभेचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याबाबत सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.