वृंदावन हॉस्पिटल संचालक डॉ.निळकंठ पाटील आयोजित महिला सबलीकरण मेळाव्यात; महिला भगिनींची तुफान गर्दी…
पाचोरा-
दिनांक: 01/09/2024 रविवार रोजी पाचोरा येथील दैवयोग मंगलकार्यालय येथे दुपारी 12:00 वा.महिला सबलीकरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. मीनाक्षी ताई निकम – चाळीसगाव (सामाजिक कार्यकर्ता ) यांचा सत्कार डॉ. निळकंठ पाटील यांनी केला.नारी शक्ती मुळे देशाचा विकास होताना दिसतो. आपल्या देशाच प्रभावी व्यक्तिमत्व पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी. तसेच मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस महा. राज्य यांच्या सारखं नेतृत्व महिलांसाठी असणाऱ्या विशेष योजना त्यांनी घेतलेले निर्णय हे महिलांसाठी प्रभावी ठरत आहेत. आज देश विश्व गुरुपदी वाटचाल करताना दिसतोय. यात महिलांची भूमिका इ. विषयावर मीनाक्षी ताईनी मार्गदर्शन केले.
पूज्य तपस्विनी गरुवर्य आई ( महानुभाव पंथ )पाचोरा यांचा सत्कार मयुरीताई पाटील यांनी केला.अनुलोम संस्था दत्ताजी नाईक ( उप विभाग जनसेवक जळगांव )
श्री. डॉ. निळकंठ पाटील यांनी उपस्थित मातृशक्तीला देव, देश, धर्म, याविषयी महिलांची भूमिका काय असली पाहिजे. याविषयी सामाजिक संदेश देण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते विकासजी लोहार यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनाची माहिती सांगितली विशेष समाजाला आदर्श निर्माण करून देणाऱ्या रिक्षा चालक आशाताई भुजंग पाचोरा शहर, सौं कांताबाई संभाजी चौधरी यांनी एकरी 23 क्विंटल कापूस दादा लाड तंत्र वापरून विक्रमी उत्पन्न घेतले, यांना मॉ साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.डॉ.विठ्ठल बागुल वैद्यकीय आघाडी भाजपा. ता. जामनेर यांचा सत्कार डॉ. विजय पाटील सर यांनी केला.श्री. मधुभाऊ काटे जि. सरचिटणीस भाजपा. जि.प. सदस्य,यांचा सत्कार डॉ.निळंकंठ पाटील यांनी केला. सौं. साधना देशमुख भाजपा माजी महिला ता. पाचोरा आघाडी यांचा सत्कार, अर्चना पाटील यांनी केला सौं. वैशाली काबरा (उद्योजक )सौं. स्वाती ताई कुलकर्णी सौं स्मिता ताई सराफ वनवासी कल्याण आश्रम सामाजिक कार्यकर्त्यां उपस्थित होते.
सदरच्या महिला सबलीकरण मेळाव्यात मातृशक्तीचे विराट दर्शन घडले. पाचोरा तालुक्यातील मोठ्या संख्येने महिलाभगिनींची मेळाव्यात उपस्थिती लाभली.
यात सरूबाई धुमाळ 95 वर्षांच्या आजीने डॉ. निळकंठ पाटील यांचा सत्कार देखील केला. ही मातृशक्ती आजपर्यंत डॉक्टरांनी दिलेल्या आरोग्य सेवेचे दैवी दर्शन यातून घडले.मेळावा संपन्न करण्यासाठी असंख्य सामाजिक कार्यकर्त्याचे सहकार्य घेतले.