मौलाना आज़ाद रिसर्च व ट्रेनिंग इन्स्टीटुट (MARTI)मार्टी ला मान्यता; छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यालय.
पाचोरा-
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, छत्रपती शाहु महाराज संशोधन व प्रशिक्षण मानव विकास संस्था, महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, आदिवासी शिक्षण व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी आद स्वायत्त संस्थाच्या धर्तीवर अल्पसंख्यक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. संस्थेचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये असणार आहे. कार्यालयासाठी ११ पदे निर्माण करण्यासह साडे सहा कोटी रूपयाचा निधीची तरतूद करण्यात आली.
मार्टी संस्थेमुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना आता संस्थेव्दारे जेईई, नीट, यासारख्या स्पर्धा परीक्षासाठीचे प्रक्षिशणासह संशोधनासाठी आर्थिक मदत शक्य होणार आहे. मार्टी कृती समिती जळगाव जिल्ह्यासह मार्टी कृती समीतीचे प्रदेश अध्यक्ष अँड. अझहर पठाण यांनी संभाजीनगरातुन मागणीला सुरवात केली होती. अल्पसंख्यक समाजातील अनेक तरुण आर्थिक परीस्थीतीमुळे शिक्षणापासुन दुर जात आहेत. अल्पसंख्यक समाजातील तरूणाच्या शैक्षणिक,सामाजिक, आर्थिक विकासाठी राज्यात “मार्टी रिसर्च अँन्ड ट्रेनिंग इन्स्टीट्यूट” स्थापनेची मागणीसाठी मागील चार वर्षा पासुन लढा सुरू होता. मार्टी संस्था स्थापन करण्यासाठीचा पाठपुरावा कृती समितीकडून करण्यात येत होता. अखेर राज्य सरकारने राज्यात अल्पसंख्यक संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्यक विकास विभागाध्यक्ष अधिपत्याखाली ही संस्था असणार आहे.
“अल्पसंख्यक समाजातील अनेक विध्यार्थी आर्थिक परीस्थीतीमुळे शिक्षणा पासुन वंचित राहतात या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक युगात समान संधी प्राप्त व्हावी, अल्पसंख्यक समाजातील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक विकासाठी मागील चारवर्षा पासुन सरकारकडे संस्थेची मागणी करीत होता. सत्ताधारी, विरोधी पक्षातील नेत्यानी आमचा मागणीला पाठींबा दीला. मार्टी संस्था स्थापन करण्याची मान्यता राज्य सरकारने मान्यता दिली.
अँड. अमजद अ. पठाण,
जळगांव जिल्हा अध्यक्ष,
अल्पसंख्यक संशोधन व प्रशिक्षण संस्था कृती समिती