आज पाचोऱ्यात छ.शिवाजी महाराज विटंबना निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन..
पाचोरा-
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना च्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
कोकणात राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आठ महिन्यात पडला तर त्यावेळी जी विटंबना झाली या विरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून आज दि २ रोजी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे वतीने ‘जोडो मारो -‘ आंदोलन करण्यात येणार आहे. दि. २ रोजी पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी १० :३० वाजता आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनाच्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, उबाठा सेनेचे तालुका अध्यक्ष शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहर अध्यक्ष अजहर खान, विधानसभा संघटक नितीन तावडे उबाठा सेनेचे शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरुण पाटील, माजी उपजिल्हा प्रमुख अॅड अभय पाटील, शहर प्रमुख अनिल सांवत, युवा सेना तालुका प्रमुख शशी पाटील, मनोज चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, अभिषेक खंडेलवाल, निखिल सोनवणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष कल्पेश येवले आदी उपस्थित होते.