नांदगाव!माथेफिरू चढला रेल्वेच्या डब्यावर, प्रसंगावधान राखत ओव्हर हेड वायरचा केला विद्यूत प्रवाह बंद,
नांदगाव-
वेडसर माथेफिरू असलेला एक व्यक्ती पहाटेच्या सुमारास नांदगाव रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या कुशीनगर एक्स्प्रेस या प्रवाशी गाडीच्या डब्ब्यावर चढला अन् इकडे तिकडे डब्याच्यांवर फिरू लागला. या गाडीवरून त्याने स्थानकात उभी असलेली महानगरी एक्स्प्रेसवर ही उडी मारली.यावेळी ‘ ओव्हर हेड वायर ‘अगदी जवळच होती.त्या इसमाचा थोडाही स्पर्श या तारेला झाला असता तर त्याचा विद्युत करंट लागून जीव गेला असता.
मात्र रेल्वेच्या इलेक्ट्रिक विभागाचे प्रमुख, संदीप पाटील यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ ओव्हर हेड वायरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने त्या व्यक्तीचा जीव वाचला.
यावेळी रेल्वे स्थानकावर उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी त्याला रेल्वेच्या डब्ब्यावरून खाली उतरवले या सर्व प्रकारामुळे कुशीनगर एक्स्प्रेस,व महानगरी एक्स्प्रेस मात्र अर्ध्या तासाच्या फरकाने स्थानकाबाहेर पडावे लागले.या माथेफिरूला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.