नाभिक समाजाला सर्वतोपरी मदतीसाठी कटीबध्द;वैशालीताई सुर्यवंशी पाचोऱ्यातील समाजबांधवांना उपयुक्त किटचे वाटप
पाचोरा-
नाभिक समाजबांधवांना दैनंदिन जीवनात अनेक समस्या भेडसावत असून याचे निराकरण करण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करण्यासाठी कटिबध्द आहोत असे प्रतिपादन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या नाभिक बांधवांना किट वाटप करण्याच्या कार्यक्रमात बोलत होत्या.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या वतीने पाचोरा शहरातील गाडगेबाबा नगर आणि अमृत नगर या भागात नाभिक समाज मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजबांधवांच्या वतीने वैशालीताईंचे स्वागत करण्यात आले. यानंतर ताईंच्या हस्ते समाजबांधवांना उपयुक्त ठरणाऱ्या किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी, रमेश बाफना, दीपक पाटील, अनिल सावंत, अभिषेक खंडेलवाल, बंडू मोरे, नाना वाघ नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष व समाजबांधव तसेच शिवसेना, युवासेना, युवती आघाडी, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.