उदंड उत्साहात सुरू झाली शेतकरी शिवसंवाद यात्रा;वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत
पाचोरा-
मतदारसंघातील सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेत त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी काढलेल्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला आज पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त असा प्रतिसाद लाभला असून ठिकठिकाणी ताईंचे अतिशय जोरदार स्वागत करण्यात आले.
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील ‘शेतकरी शिवसंवाद यात्रा’ आज नगरदेवळा-बाळद जिल्हा परिषद गटातून सुरू झाली. आज पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात पाचोरा तालुक्यातील निपाणे, मेहुलाई तांडा, बदरखे, बदरखेतांडा व आखतवाडे या गावांमध्ये शेतकरी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून वैशालीताईंनी जनतेशी संवाद साधला.
या यात्रेच्या दरम्यान, वैशालीताई सुर्यवंशी यांचे प्रत्येक गावात वाजंत्रीसह जोरदार आतषबाजी करून स्वागत करण्यात आले. यात्रा सुरू करण्याआधी वैशालीताईंनी प्रत्येक गावातील विविध देवस्थानांमध्ये जाऊन आशीर्वाद घेतले. तसेच त्यांनी विविध गणेश मंडळांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या श्री गणेशाचे देखील दर्शन घेतले. यानंतर त्यांनी प्रत्येक गावातील आबालवृध्दांशी संवाद साधला. सर्व गावांमध्ये गावकऱ्यांनी मोठ्या आनंदात ताईंचे स्वागत केले. महिलांनी औक्षण करून तोंड गोड करत त्यांच्या आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर, प्रत्येक ठिकाणी ताईंनी उपस्थितांना येणाऱ्या अडचणींबाबत विस्तृत चर्चा केली. यात प्रामुख्याने गावासह परिसरातील न झालेली विकासकामे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यांच्याबाबत विवेचन करण्यात आले.
दरम्यान, आपण भयमुक्त आणि भ्रष्टाचारमुक्त सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द असून सध्याची भयंकर स्थिती बदलण्यासाठी पाचोरा मतदारसंघात परिवर्तनाचा लढा देत असल्याचे वैशालीताई म्हणाल्या. तर जनतेचे या परिवर्तनाच्या लढाईत सहभागी होण्याचे आवाहन देखील त्यांनी याप्रसंगी केले.
शेतकरी शिवसंवाद यात्रेत निपाणे येथील सरपंच संजय रूपजी पाटील यांच्यासह भिकन भगवान पाटील, दत्तात्रय पाटील, नाना पृथ्वीराज पाटील, सुदाम पाटील, वाल्मीक पाटील, अण्णा टेलर, किशोर राजधर पाटील आदींसह ग्रामस्थ सहभागी झालेत. मेहुलाई तांडा येथे विकास राठोड, विनोद राठोड, तोताराम दगा राठोड, योगेश बद्री जाधव, मलखाम राठोड, अंबरसिंग जाधव आणि महेंद्र मंगलसिंग परदेशी यांच्यासह इतरांनी वैशालीताई सुर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांचे अतिशय जल्लोषात स्वागत केले.
बदरखे येथे भूषण पाटील, गणपत गढरी, सुधाकर गढरी, राहूल प्रकाश पाटील, मेघनाद पाटील संजय नामदेव गढरी, दिलीप गढरी, गणपत पाटील आदींनी तर बदरखे तांडा येथे सुशीला राठोड, बाळू सर, भरत राठोड, अशोक पंडित चव्हाण, अनिता राठोड व शरद उखा राठोड यांच्यासह ग्रामस्थांनी शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैशालीताई सुर्यवंशी यांचे स्वागत करून त्यांच्या सोबत संवाद साधला. तर, आखतवाडे येथे भैय्या पाटील, बापू गढरी, अजय पाटील, वाहिद पठाण, रमेश गढरी, शाकीर शेख आदींसह गावातील आबालवृध्दांनी वैशालीताई सुर्यवंशी यांच्या समोर त्यांना येणाऱ्या अडचणींबाबत गाऱ्हाणे मांडले. ताईंनी या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
या शेतकरी शिवसंवाद यात्रेत वैशालीताई सुर्यवंशी यांच्या सोबत उध्दव मराठे, अरूण पाटील, शरद पाटील, बालूअण्णा, राजेंद्रसिंग देवरे, प्रशांत पाटील, अजय दादाभाऊ चौधरी, प्रमोद नाना, योजनाताई पाटील, कुंदनताई पांड्या, जयश्रीताई येवले, लक्ष्मीताई पाटील, अनिताताई पाटील, मनीषाताई पाटील, निताताई भांडारकर, उषाताई परदेशी, गायत्रीताई बिरारी, दत्तू भोई, योगेश समारे, सोमनाथ भोई, मुकेश राजपूत, मनोज गुरव, अनिल शिंपी, रवींद्र महाजन, विकी जाधव, रामचंद्र महाजन, पांडुरंग भामरे, नाना सोनजी, अशोकबापू, भैय्यासाहेब, अविनाश पाटील, बंटी गायकवाड, राहूल गायके, बंटी पाटील, शशिकांत पाटील, बंडूनाना, भूषण शिंदे, रतन पाटील, करण गायकवाड, संदीप पाटील, सागर देवरे, स्वरूप राजपूत आदी मान्यवरांसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.