क्राईमजळगाव जिल्हा

बॅग लिफ्टींग करणारे आरोपींना काही तासातच, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली अटक..


जळगाव-

दिनांक ०९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास जळगाव शहरातील दादावाडी जैन मंदिराजवळ बॅग लिफ्टींग झाल्याचे मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना माहिती भेटताच त्यांनी सदर घटनास्थळी IDBI बँकेचे ATM जवळ फिर्यादीस भेटून त्यांना सविस्तर विचारपुस केली असता, मो.सा.क्र. MH19EH 9974 वरील तिन अज्ञात इसमांनी फिर्यादीचे i 20 गाडीत बसलेल्या फिर्यादीच्या मुलाचे लक्ष विचलीत करून गाडीतील बॅग मध्ये ठेवलेले 1,20,000/- रु. कि.ची बॅग गाडीतून चोरुन नेल्याचे सांगीतले.

त्यावर मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोलिस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय पोटे, सफौ. रवि नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पोह राजेश मेंढे, हरिलाल पाटील, विजय पाटील, ईश्वर पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम स्थागुशा जळगाव अशांना कळवून तात्काळ मो.सा.क्र. MH19EH9974 वरील तिन अज्ञात इसमांचा शोध घेणे बाबत आदेश दिलेत. त्यावरून सदर पथकाने तांत्रिक पध्दतीने व बौध्दीक कौशल्याचा वापर करून, मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे मो.सा.क्र. MH19EH9974 वरील तिन अज्ञात इसम हे भुसावळ कडे गेल्याचे समजल्याने त्यांचा पाठलाग करीत असतांना भुसावळ गावापासून बोदवड कडे जाणाऱ्या रोडने जात असतांना सदरचे इसम हे मो.सा.ने पुढे जात असल्याबाबतची तांत्रिक माहिती मिळाल्याने त्यांचा पाठलाग सुरु ठेवला त्यावेळी मोंढाळे गावाचे पुढे साधारण १ कि.मी. अंतरावर कच्चा रस्त्याने त्यांनी त्यांची मो.सा. वर जात असतांना वरील पथकाने त्यांना थांबण्याचा इशारा व आवाज दिला असता त्यांनी गाड्या रस्त्यावर सोडून कपाशीच्या व मक्याच्या शेतामध्ये पळू लागले त्यावेळी  पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी त्यांचा पाठलाग करून कापशीच्या व मक्याच्या शेतामधुन तिन इसमांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनुक्रमे १) असे सांगीतले. त्यावेळी त्यांना वरील गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारणा केली असता त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याचे कडून 1,20,000/- रु. रोख रक्कम हस्तगत करण्यात आल्याने त्यांना रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेले मोटार सायकल हे पुढील तपासकामी जळगाव तालुका पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री संदिप गावीत, उप विभागीय पोलीस अधिकारी जळगाव भाग, मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!