पाचोरा भडगाव तालुक्यातील सकल नाभिक समाज बांधवांच्या मेळावा उत्साहात संपन्न..
पाचोरा-
दिनांक ९ सप्टेंबर २०२४ सोमवार रोजी पाचोरा येथील समर्थ लॉन्स येथे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वतीने सकल नाभिक समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी नाभिक समाज बांधवांना विवीध मुद्दावर चर्चा करत मागदर्शन केले.
तसेच नाभिक समाज बांधवांना सलून दुकानीसाठी उपयुक्त साहित्य किट चे वाटप यावेळी करण्यात आले.
यावेळी शिवसेना प्रवक्ते प्रदिप देसले, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, किशोर बारवकर, तालुका प्रमुख, सुनिल पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यास मोठ्या संख्येने भडगाव पाचोरा तालुक्यातील नाभिक समाज बांधव भगिनी उपस्थित होते.मेळाव्यात नाभिक समाज बांधवांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची संकल्पना केली.
मेळाव्याचा शेवटी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.