पाचोरा शहरात ईदचा जुलूस 18 सप्टेंबरला, सामाजिक एकोप्यासाठी मुस्लिम समाजाच्या निर्णय
पाचोरा-
गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी पाचोरा शहरात ईदचा जुलूस (मिरवणूक) काढण्याच्या निर्णय मुस्लिम समाज व धर्मगुरूंनी घेतलेला आहे. गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद चा सण यावर्षी एक दिवसाच्या फर्काने आहे. 16 सप्टेंबरला ईद-ए-मिलाद व 17 ला गणेश विसर्जन होणार असल्याने , कोणतीही अप्रिय घटना न घडवून, बंधुत्व, जातीय सलोखा, सामाजिक एकोप्यासाठी,गर्दी आणि मिरवणुकांचे योग्य व्यवस्थापन पोलीस प्रशासनास शक्य व्हावे,म्हणून शहरात मुस्लिम समाजाकडून गणपती विसर्जनानंतर ईद-ए-मिलाद ची मिरवणूक 18 सप्टेंबरला काढण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भात पाचोरा शहरातील सर्व मशिदचे मौलवी,ट्रस्टी , जुलूस कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी सोमवार रात्री, उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पाचोरा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्याशी भेट घेऊन निवेदन द्वारे ह्या निर्णय बाबत अवगत केले. पाचोरा शहरातील मुस्लिम बांधवाकडून घेण्यात आलेल्या ह्या निर्णयाच्या सर्व कडे कौतुक होत आहे. पोलीस प्रशासनानेही ह्या निर्णयाच्या स्वागत केलेला आहे. गौसिया मशीदचे खतीब व इमाम मौलाना नईम रजा व जुलूस कमिटी सदस्य शेख जावेद रहीम यांनी याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती दिली. ईद-ए-मिलाद 16 सप्टेंबरला असला तरीही शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी मिरवणूक(जुलूस)दोन दिवस नंतर म्हणजे 18 सप्टेंबरला काढण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे.16 सप्टेंबरला पैगंबर जयंती आहे.त्याच दिवशी घरोघरी तसेच मशिदीमध्ये सर्व कार्यक्रम होतील. केवळ ईद-ए-मिलादची मिरवणूक 18 सप्टेंबरला होईल. मुतवलली मेहमूद खान यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले. निवेदन देत्या वेळी, मौलाना जीशान रजा, मौलाना नईम रजा, मौलाना हसनैन रजा, इक राम रजा, मेहमूद खान, वहाब बागवान, शेख जावेद रहीम,जहांगीर पिंजारी, जॅकी खाटीक, इतर मान्यवर उपस्थित होते.