जळगाव जिल्ह्यातील आठ शिक्षकांची महात्मा फुले शिक्षक पुरस्कारासाठी निवड.
जळगाव-
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेतर्फे यंदा जळगाव जिल्ह्यातील आठ शिक्षकांची महात्मा फुले शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पैकी एकास “राष्ट्रीय कलारत्न” तर उर्वरित सात शिक्षकांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजी शिंदे यांनी प्रसिद्धीसाठी दिली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेची 13 वी राज्यस्तरीय “शिक्षण परिषद” 19 नोव्हेंबर 2023, रविवार रोजी सावंतवाडी , जिल्हा सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील गुणवंत शिक्षक तसेच विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तींचा या वेळी पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला कुणबी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष गिरीश भाऊ जाधव, मंगेश चिवटे ₹, प्रा. डॉ. शिवाजी महाजन उपस्थित राहणार आहेत. तर समारोप सोहळ्याला उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, उपस्थित राहतील अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष तथा संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव जाधव , प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली आहे.
या शिक्षण परिषदेत जळगाव जिल्ह्यातील आठ शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. दीपक शंकर सोनवणे (राष्ट्रीय कन्या शाळा, चाळीसगाव) यांना राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
प्रा. रवींद्र भिकनराव चव्हाण (कन्या विद्यालय, पाचोरा), श्री. चंद्रकांत बाजीराव पाटील (माध्यमिक विद्यालय, खडकदेवळा), श्री हिलाल दौलत बोरसे (राष्ट्रीय कन्या शाळा, चाळीसगाव), नरेंद्र शिवाजी मोरे (श्री दत्त हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदसर), जितेंद्र संतोष पवार (माध्यमिक विद्यालय दहिवद ता.चाळीसगाव), विशाल सुरेश खोडके (माध्यमिक विद्यालय, पाटणा), व सौ.अश्विनी योगेश कोळी (भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, न्हावी, ता. यावल) यांना महात्मा ज्योतिराव फुले राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे व जिल्हा सचिव प्रवीण मोरे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.