लोहटार येथे उबाठा शिवसेना नेत्या वैशालीताईंच्या,शेतकरी संवाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोहटार-
पाचोरा तालुक्यातील लोहटार गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी आज सकाळी शेतकरी शिव संवाद यात्रेत लोहटार गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गावातील महिलांकडून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गावातील श्रीराम मंदिरात वैशालीताईंनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी येथील प्रमुख मार्गावर वैशालीताईंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संवाद यात्रेत विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्याचे दिसून आले. या गावात महिला पदाधिकाऱ्यांनी प्रचार दौऱ्यात उस्फूर्तपणे सहभाग घेऊन ताईला पाठिंबा दिला आहे. वैशालीताई सूर्यवंशी यांनी गावातील ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.
गावातील प्रमुख कार्यकर्ते गोपाल परदेशी, जितेंद्र बाबूलाल महाजन, शिवदास भागवत महाजन, सम्यक वाघ, ऋषभ पटेल यांच्यासह गावातील महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी शिवसंवाद यात्रेत शिवसेना शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव मराठे, ॲड. अभय पाटील, गजू पाटील, राजेंद्र राणा, अभिषेक खंडेलवाल, प्रमोद नाना पाटील, संदीप जैन, नामदेव चौधरी, तिलोतामा मौर्य, कुंदन पाड्या, अरुण तांबे, अनिता पाटील, लक्ष्मी पाटील, जयश्री येवले, उषा परदेशी, बेबाबाई पाटील, नीता भंडारकर, मनीषा पाटील, अरुण तांबे, आवेश खाटीक, नाना भिमसिंग पाटील, विजय आनंदा पाटील, पी. एन. पाटील, अण्णा कोळी, विश्वास पाटील, संभाजी पाटील, भरत पाटील, प्रणित पाटील, शरद पाटील, सदाभाऊ चौधरी, अनिल सावंत, मनोज चौधरी, शशी पाटील, शशिकांत बोरसे, योजनाताई पाटील, जयश्री येवले, लक्ष्मी पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.