जळगाव जिल्हा
कासोदा येथील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद( पैगंबर जयंती) उत्साहात साजरी केली
कासोदा ता.एरंडोल –
येथील मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात व शांततेत ईद-ए-मिलाद अर्थात (पैगंबर जयंती)
मोठ्या उत्साहात व शांततेत साजरी केली
दुपारी 2 वाजता बिजली शाह बाबा दर्गा पासून (जुलुस) मिरवणुकीला सुरुवात झाली होती. मिरवणुकीत नाते शरीफ चे पठाण करीत मिरवणूक हजरत सादिक शाह सरकार, बिर्ला चौक मार्गाने ईदगाह मैदानात मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मुस्लिम बांधवांनी तेथे मगरीब ची नमाज अदा केली व विश्वशांती हिंदू मुस्लिम एकता गरीब दुर्बल घटक व आरोग्यांसाठी प्रार्थना करण्यात आली.
मिरवणुकीत पांढरे शुभ्र वस्त्र पठाणी ड्रेस व फेटा आकर्षित ठरले साहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.