क्राईमजळगाव जिल्हा

पिंपळगाव हरेश्र्वर! ट्रक अपघातात जखमी झालेल्या वृद्धाचा उपचार दरम्यान मृत्यू..

पाचोरा-

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी कालिंका माता मंदिर ते शनी मंदिर या रस्त्यावर  ट्रक क्रमांक एम. एच. १९ इ. बी. ४७०३ या नंबरच्या ट्रक चालकाने रस्त्यावरुन जात असलेल्या विश्वनाथ धनजी सोनवणे या ७८ वर्षीय वृद्धास जोरदार धडक दिली होती या धडकेत विश्वनाथ सोनवणे यांना जबर मार लागल्याने त्यांचा एक पाय निकामी झाला होता. या झालेल्या अपघाताची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी वृद्धाला तातडीने जळगाव येथे दवाखान्यात पाठवून ‌घटनास्थळाचा रितसर पंचनामा करुन ट्रक चालका विरोधात भा. द. वी. कलम २८१, १२५ (असं), १२५ (ब), १८४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.

परंतु दिनांक १७ सप्टेंबर २०२४ मंगळवार रोजी अपघातात जखमी झालेल्या विश्वनाथ सोनवणे यांचा जळगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना पिंपळगाव हरेश्वर गावात माहीत पडताच विश्वनाथ सोनवणे यांचा परिवार, नातेवाईक तसेच संपूर्ण मराठा समाज आक्रमक झाला होता कारण अपघात होऊन तीन दिवस उलटले तरीही ट्रक चालकाला अटक करण्यात आली नव्हती व त्यातच विश्वनाथ सोनवणे यांचा मृत्यू झाल्याने जोपर्यंत ट्रकच्या चालकाला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही अपघात मयत झालेल्या विश्वनाथ सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती.

यावेळी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी तणाव निर्माण झाला असल्याची परिस्थिती लक्षात घेऊन समयसूचकता राखत पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर व अमोल पवार यांना योग्य त्या सूचना देऊन फरार झालेल्या ट्रक चालकाला शोधून ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या सुचनेनुसार उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर व अमोल पवार यांनी आपली सुत्रे फिरवून फरार झालेला ट्रक चालकास तात्काळ अटक केली.

पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी ट्रक चालकाला शोधून अटक केल्यावर जमाव शांत झाला व लगेचच अपघातात मयत झालेल्या विश्वनाथ सोनवणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र सुरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल बेहेरे हे करीत आहेत.

जनमानसातून मिळालेल्या माहितीनुसार ईश्वर कुंभार यांच्या मालकीचा ट्रक हा जुना असून त्याची कोणतीही कागदपत्रे नाहीत तसेच ट्रक चालकाकाकडे वाहन चालवण्याचा परवाना नसून तो पूर्ण प्रशिक्षित नसल्याने हा अपघात घडला असून यात विश्वनाथ सोनवणे या वृद्धाचा नहाक बळी गेल्याने पिंपळगाव हरेश्वर गावातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्याने ३०४ हे वाढिव कलम लावण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!