कासोदा येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाची उत्साहात सांगता.
कासोदा ता.एरंडोल –
कासोदा येथे गेल्या 70 वर्षापासून अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सद्गुरु गोविंद महाराज यांच्या नावाने सुरू केलेला आहे ती परंपरा कायम ठेवत भाद्रपद अष्टमीला सुरू झालेला अखंड कीर्तन सप्ताह भाद्रपद पौर्णिमा म्हणजे 29 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी सहा वाजता काकड आरती काकड आरतीस गावातील व परिसरातील हजारोच्या संख्येने आबाल वृद्ध महिला पुरुषांसह असंख्य भाविक उपस्थित होते. याला कासोदा गावाची दिवाळी म्हणूनही संबोधण्यात येते देखावा तयार होतो. काकडा आरतीच्या अगोदर सकाळी तीन ते चार वाजेपासून स्थापनेच्या वेळेस जे पाच जोडपी पूजेस होती त्याच पाच जोडप्यांचा हस्ते समाप्तीच्या दिवशी पूजा करण्यात आली भटजी म्हणून गणेश जोशी प्रमोद पत्की महाराज हे होते.
काकड आरती नंतर सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत काल्याचे किर्तनाने किर्तन सप्ताहाची सांगता करण्यात आली त्यानंतर अकरा वाजेपासून ते संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत कासोदा आणि परिसरातील भाविक भक्तांनी हजारोच्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी सहा वाजेपासून गावातील विविध मंडळांनी ढोल ताशे वाजवत गुलाल उधळत मिरवणूकिस सुरुवात करण्यात याप्रसंगी मुलींच्या शिवकन्या लेझीम मंडळाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले . रात्री दहा वाजेच्या दरम्यान मिरवणूक पालखी जामा मशीद जवळ आली असता मशिदीचे मुस्लिम पंच कमिटीचे सदस्यांसह सर्वांनी पालखीला सालावादाप्रमाणे शाल, नारळ पुष्पगुच्छ देत पालखीचे स्वागत केले. रात्रभर लेझीम मंडळाचे कार्यकर्ते पालखी समोर नाचून आनंद व्यक्त करत होते. पालखी ठरलेल्या मार्गाने महादेव मंदिरापासून जामा मशीद, जुने पोस्ट ऑफिस, शेलार वाडा मार्गे, ठाकरे गल्ली ,महादेव मंदिरात मिरवणूक समाप्त करण्यात आली. याप्रसंगी चाळीसगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे व विविध गावातून आलेले पोलीस अधिकारी व कासोदा गावातील पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सप्ताह शांततेत उत्साहात पार पडला. अखंड हरी नाम कीर्तन सप्ताह उत्साहास पार पाडण्यासाठी हरिनाम सप्ताह पंचायत समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, उपाध्यक्ष भूषण शेलार ,अण्णा चौधरी, सचिव दीपक माळी नंदू पाटील (खैरनार), संजय येवले व पंच कमिटीचे सदस्य तसेच गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.