जळगाव जिल्हा

नगरदेवळा येथे डॉ.निळकंठ पाटील यांनी घेतलेला शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न..


नगरदेवळा-

पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे डॉ.निळकंठ पाटील यांच्या वतीने शेतकरी बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सतिष अण्णा पाटील, तसेच श्री विकासजी लोहार यांनी मार्गदर्शन केले शेतकरी बंधुनी विषमुक्त अन्न पिकवण्यासाठी प्रयत्न करावे,विषारी अन्न खाल्याने मानवी जिवणावर होणारे दुष्यपरीणामाची माहिती दिली व शेतकरी बंधुनी आपल्या कुटुंबाकरीता विषमुक्त भाजीपाला व कडधान्य आपल्या शेतात पिकवावे असे आवाहन केले.

शेतकरी मेळाव्याचे मुख्य मार्गदर्शन डॉ.निळकंठ नरहर पाटील म्हणाले,बारमाही नद्या जिवंत करण्यासाठी ताकदीने प्रयत्न करेल.मला आमदार म्हणून निवडून आणल्यावर तापी नदीचे पाणी वॉटर लिफ्टिंग ने पाणी नद्यांना बारमाही जिवंत करेल. यामुळे शेतकरी राजा बाराही महिना उत्पन्न घेतील. मी हॉस्पिटल डॉक्टरकी, सांभाळुन शेती करतो त्यामुळे शेतकरी बांधवांना येणाऱ्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहिती आहे त्या अडचणी मी सोडवण्यासाठी तत्पर आहे.आपण सर्वानी मला एकवेळा आमदार बनण्याची संधी द्यावी. असेही ते म्हणाले.व्यासपीठावर मान्यवरांचे सत्कार करण्यात आला.

त्यामध्ये श्री गणपत शंकर कोष्ठो  गुरुजी श्री सर्जेराव माधवराव पाटील, श्री परशुराम भडांगे,धनगर वाडी,श्री भास्कर कोष्ठी,नगरदेवळा शेंद्रीय शेती करता,श्री संजय घुडकू भोई बाळद बु,श्री डॉ एम.बी.परदेशी आखतवाडे,श्री सचिन महाजन युवा शेतकरी नगरदेवळा, श्री विकास पवार कृषी गट खाजोळा,श्री फुलसिंग डोंगर गढरी,श्री भगवान वामन संसारे,श्री जगदीश नाना पाटील, वाडी शेवाळे,श्री अरुन दगडु अहिरे बदरखे तांडा श्री ज्ञानेश्वर हरी पाटील, श्री सचिन पाटील नेरी,श्री अजबराव पाटील सार्वे,श्री कमलेश पाटील सार्वे श्री उत्तम शंकर पाटील सार्वे.अशोक हरीचंद्र पाटील श्री धर्मराज पाटील बात्सर उप संरपंच श्री कैलास शिवदास सोमवंशी बाळद बु,श्री मोतिलाल पाटील घुसर्डी ता पाचोरा, मेळाव्यात उपस्थित शेतकरी बांधवांना बळीरामाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.मेळावा यशस्वी संपन्न करण्यासाठी वृंदावन फाउंडेशन चे कार्यकत्यांनी परीश्रम घेतले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!