जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची बैठक संपन्न.



पाचोरा-

दि.०१/१०/२०२३ रोजी पाचोरा येथील हुतात्मा स्मारक येथे रिपाई आठवले गटाची बैठक संपन्न झाली.रिपाई आठवले गट जळगाव जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे यांच्या नेतृत्वात पाचोरा तालुका बैठक संपन्न झाली या बैठकीत गाव तेथे शाखा व फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज सह सर्व महापुरुषांचे विचार गावोगावी पोहोचवण्याचं काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी करावे ही संकल्पना करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकारी यांची निवड करून त्यांचे स्वागत करण्यात आले या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुदास भालेराव कार्याध्यक्ष, रमेश सुरवाडे तालुका सचिव,संदीप चव्हाण विभागीय अध्यक्ष पिंपळगाव गट, रामदास गायकवाड ता.उपाध्यक्ष, प्रकाश भीवसने शहर उपाध्यक्ष, प्रियंका सोनवणे महिला आघाडी पाचोरा, संतोष गायकवाड खडक देवळा, सुनील जावळे माजी सरपंच दहिगाव, गोवर्धन जाधव मोची समाज संघटना अध्यक्ष पाचोरा, गणेश सुरवाडे पुणगाव ,मुकेश जाधव,रामसिंग चव्हाण पुनगाव, व भैया बागवान यांना युवा तालुका अध्यक्ष पद देण्यात आले.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!