गोंडगाव! डॉ.निळकंठ पाटील आयोजित शेतकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद..
भडगाव-
आज दिनांक 26/09/2024 गुरुवार रोजी, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे डॉ.निळकंठ पाटील यांच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श शेतकरी श्री गंगाराम लोटन पाटील गोंडगावकर हे होते.
प्रमुख मार्गदर्शक श्री.सहकार महर्षी श्री.उत्तम दादा थोरात रा.स्व. संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, यांनी शेतकऱ्यांनी शेतीसाठी 4M समजून घेण्याची आहे प्रकर्षाने लक्षात आणुन दिले, (4 M फोर एम ), 1M) मनी पावर ( आर्थिक व्यस्थापन ) M2) मँन पावर (मनुष्य बळ M3) मँनेजमेट (व्यवस्थापन M4)मार्केट (बाजारपेठ) इ. विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.शेतकरी आत्मनिर्भर व स्वावलंबी कसा बनेल तसेच स्वातंत्र्य नंतर राज्य करत्यांनी शेतकऱ्यांना चुकीच्या सवयी लावल्या व चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जात गेला.या मधुन बाहेर निघण्यासाठी नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती ,विषमुक्त शेती गौ आधारित शेती केली तर खर्चात बचत होवुन उत्पन्नात वाढ होईल यासाठी मार्गदर्शन केले.
डॉ.निळकंठ पाटील यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले, नदी खोलीकरण, त्यांनतर मका पिका पासून मका पासून स्टार्च निर्मिती करणे, (स्टार्च ) फॅक्टरी तसेच इथेनॉल प्रोजेक्ट उभा करणे. केळीवर, मोसंबी, लिंबू यावर आधारित प्रक्रिया उद्योग शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उत्पादन वाढविणे. इ. आमच्या भागातील शेतकरी साठी मला वयक्तिक स्वार्थासाठी कंपन्या उभ्या करायची नसून प्रत्यक्ष, 25 शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या करण्याचा मानस व्यक्त केला.शेतकऱ्यांना कोणत्या समस्या उद्भवतात हे मला ठाऊक आहे कारण मी डॉक्टर जरी असलो तरी डॉक्टरकी संभाळून शेती करतो,आगामी काळात मी भडगाव पाचोरा विधानसभा हि शेतकऱ्यांसाठी लढणार आहे आणी पुढील आमदार हा भडगाव चा भुमिपुत्र असेल कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लढायचं आहे व जिकांयच आहे.असा निर्धार केला.या वेळी गोंडगाव गावाला लागुन असलेले पंचक्रोशीतील 30 शेतकरी बंधूचा सत्कार डॉ. निळकंठ पाटील व. डॉ.विजय पाटील यांनी केला.श्री अशोक संतोष पाटील पांढरद,श्री रमेश शेनपडु पाटील गोंडगाव श्री गंगाराम पाटील गोंडगाव, श्री भिमराव महादु पाटील गोंडगाव, श्री रविंद्र गणपत पाटील गोंडगाव, श्री बापु बाबुलाल पाटील, श्री सिताराम रामचंद्र पवार तांदुलवाडी मा संरपंच, श्री दादाभाऊ वेळु पाटील तांदुलवाडी संरपंच श्री नागो केशव पवार तांदुलवाडी, श्री शामकांत हिरे खेडगाव, श्री विलास पाटील बोदर्डे श्री भाऊसाहेब पाटील लोण पिराचे दुग्धव्यवसाय व आदर्श शेतकरी, श्री हिरालाल परदेशी सावदे,श्री विठोबा डिंगाबर पाटील खेडगाव,श्री दिलीप दौलत पाटील सावदे,श्री नामदेव त्र्यंबक पाटील घुसर्डी ,श्री रावसाहेब देवरे बामरुड श्री,भाऊसाहेब रामदास पाटील कोठली, अभिमन्यू विनायक पाटील, कोठली, श्री मधुकर पाटील बोदर्डे, श्री मधुकर पाटील बोदर्डे, श्री नामदेव त्रंबक पाटील गोंडगाव, श्री बाबुराव पाटील कोठली, श्री दगडु पाटील कनाशी, श्री शांताराम सोनवणे बात्सर, श्री धर्मराज बोरसे बात्सर मा.उप संरपंच, श्री अशोक संतोष पाटील पांढरद,श्री नथ्थु मागो राठोड पथराड, श्री विकास हिरे खेडगाव,श्री उमेश देवा डोमरे गोंडगाव,श्री भोला पाटील गोंडगाव, श्री रविंद्र भाऊ पाटील गोंडगाव, श्री कैलास भाऊ पाटील गोंडगाव, श्री निळकंठ वामन पाटील प्रिंप्रीहाट,श्री सुकदेव वामन पाटील प्रिप्रींहाट श्री चंद्रकांत तात्यासाहेब गोंडगाव, श्री शांतीलाल रघुनाथ पाटील, उप संरपंच प्रिंप्री हाट,श्री सतिष आनंद राव पाटील तांदुलवाडी, श्री रहेमान शाहा कजगाव, श्री सुभाष हवालदार नशिराबाद,
तसेच श्री सतिष पाटील गोंडगाव, श्री रतीलाल पाटील गोंडगाव, पत्रकार बांधव यांना भगवान बळीराम यांची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री किशोर शिनकर यांनी केले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी डॉ. निळकंठ पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.