पाचोरा – भडगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करा :सचिन सोमवंशी
पाचोरा-
पाचोरा – भडगाव तालुक्यातील वादळी पाऊसाने शेतकरी उध्वस्त झाला असून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी कॉग्रेस ने केली असून अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रांताधिकाऱ्यांनी दिले पंचनामेंचे आदेश पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकरींना दुष्काळाची फुटी कवडी शासनाने दिले नाही. लगत च्या तालुक्यातील शेतकरींना त्यांच्या आमदार यांना प्रयत्न करुन लाखो रुपयांचे दुष्काळाचे अनुदान प्राप्त झाले आणि पाचोरा – भडगाव तालुक्यातील शेतकरींचे तोंडाचे पाणी पुसले गेले. सद्या ची परीस्थितीत पावसाचे अती प्रमाण झाल्याने शेतकरींचे पिक कापणीवर आले असतांना अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाउन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित तहसीलदार यांना देण्यात यावे यासाठी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शेतकरींचे नुकसान चे पंचनामे करून शासनाला अहवाल देण्यात यावा जेणेकरून तात्काळ ओला दुष्काळ शासनाने जाहीर करावा अशी मागणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे यांनी तात्काळ पाचोरा – भडगाव तहसीलदार यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले.
यावेळी कॉग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सचिव इरफान मनियार, एस सी सेल तालुका अध्यक्ष श्रावण गायकवाड, युवक माजी अध्यक्ष संदीप पाटील, शहर उपाध्यक्ष शंकर सोनवणे, फरीद शेख, शेख रशीद, संदीप वाघ आदी उपस्थित होते.