जळगाव जिल्हा

देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा प्रथम वर्षाचा १००% निकाल

पाचोरा-

शासकीय उच्चकला परीक्षा 2024
कलाशिक्षक प्रशिक्षण वर्ग (ए. टी. डी.)प्रथम वर्ष वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून स्व. अनिल दादा देशमुख चित्रकला महाविद्यालयाचा १००% निकाल लागला असून महाविद्यालयाचे ४ विद्यार्थी डिस्ट्रिक्टशन (जिल्हा स्तर) मध्ये उत्तीर्ण झाले.महाविद्यालयातून

प्रथम क्रमांक – जोशी तीर्थराज विवेक (Dist.)
द्वितीय क्रमांक – पाटील वैष्णवी किरण ( Dist.)
तृतीय क्रमांक – पाटील सानिका शांताराम (Dist.)
चतुर्थ क्रमांक – पाटील वृषाली अरुण ( Dist.)
पाचवा क्रमांक – कासार प्रिया कैलास
हे विद्यार्थी विशेष गुणांनी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. कुसूम मित्रा यांनी विशेष कौतुक करून शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्री. संदीप पाटील, प्रा. महेंद्र पाटील, प्रा. राहुल सोनवणे, संदीप परदेशी ,शुभम पाटील , जि. प. प्राथ. शाळा चिंचपुरे येथील मुख्याध्यापक सुभाष देसले सर व पालकांनी कौतुकास्पद अभिनंदन केले. प्राचार्य श्री. संदीप पाटील  यांनी यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून  असेच यशस्वी व्हा, तुमच्यातील कला अशीच बहरत राहो तुमच्यातील कला कशी वाढवता येईल याकडे विशेष लक्ष द्या व पुढील वर्षी असेच यशस्वी व्हा अश्या सदिच्छा दिल्या.

श्री. कुंदन नंदलाल बेलदार

मुख्य संपादक मु.पो.भातखंडे ता.पाचोरा जि.जळगाव मो.9423013514

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!