आखतवाडे येथे स्वच्छता अभियान मोहीम उत्साहात साजरी
पाचोरा –
तालुक्यातील आखतवाडे येथे आज दिनांक २/१०/२०२३ सोमवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीनिमित्त आखतवाडे ग्रामपंचायत सरपंच / उपसरपंच सदस्य ग्रामसेवक व तरुण युवक व पोलीस पाटील तंटामुक्ती अध्यक्ष / उप अध्यक्ष रोजगार सेवक ग्रा पं शिपाई कर्मचारी व ग्रामस्थांच्या वतीने गावात स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात आली आज सकाळी ८: ३० वाजता ग्रामपंचायत कार्यालय जवळ सर्वांनी एकत्र जमून प्रथम महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन नगरदेवळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मेडिकल ऑफिसर श्री सुनील गवळी सर यांच्या हस्ते श्रीफळ फोडण्यात आले व श्री गवळी सरांनी डेंगू ह्या आजारावर कश्या प्रमाणे उपाययोजना व प्रतिबंध आणता येईल या बाबत मार्गदर्शन केले तद्नंतर जिल्हापरिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री रितेश वाणी सर यांनी सर्व विद्यार्थी व ग्रामस्थांना बालविवाह न व बालविवाहास प्रतिबंध करण्या संबंधि शपथ दिली ह्या वेळी अतिशय मोठ्या प्रमाणात तरुण युवक शिक्षक विद्यार्थी व महिलांनि ग्रामस्थांनी गावातील कचरा साफ करून एका ट्रॅक्टर मध्ये जमा केले व सहकार्य करून चांगल्या पद्धतीने स्वच्छता अभियान मोहीम यशस्वी केल्या बद्दल उपसरपंच श्री दिपक गढरी यांनी सर्वांचे आभार मानले.
यांची उपस्थिती लाभली
(१) स्वामी विवेकानंद अभ्यासिका
(२) फैजाने रजा फौंडेशन ग्रुप आखतवाडे
(३)आखतवाडे उपकेंद्रातील सर्व कर्मचारी
(४) जिल्हापरिषद मराठी शाळेतील शिक्षक व विद्यार्थी मित्र
(५) जिल्हापरिषद उर्दू शाळेतील शिक्षक व विद्यार्थी
(६) महाराणा प्रताप मित्र मंडळ
(७) शिवशक्ती मित्र मंडळ
(८) शिवगर्जना मित्र मंडळ
(९) शौर्य गणेश मित्र मंडळ
(१०) अंगणवाडी सेविका व मदतनीस
(११) विठाई गृह उद्योग महिला बचत गट
(१२)महावितरण कर्मचारी आखतवाडे (कक्ष नेरी)
(१३) संघर्ष मित्र मंडळ
(१४) पशु चिकित्सा कर्मचारी आखतवाडे
(१५) महात्मा गांधी तंटामुक्त समिती व पोलीस पाटील आखतवाडे
(१६) भाजपा तालुका अध्यक्ष अमोल भाऊ शिंदे यांचे समर्थक आखतवाडे