पैसे कमावण्यासाठी नव्हे तर सेवेसाठी मी राजकारणात;
वैशालीताई सुर्यवंशी यांचे, ठेकेदारशाहीवरून आमदारांवर टिकास्त्र
भडगाव-
माझ्या वडलांनी कधी टक्केवारी घेतली नाही अन् मी देखील घेणार नाही. मी पैसे कमावण्यासाठी नव्हे तर सेवेसाठी राजकारणात आली असल्याचे प्रतिपादन शिवसेना-उबाठा नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या शेतकरी शिवसंवाद यात्रेत बोलत होत्या.
शेतकरी शिवसंवाद यात्रा मंगळवारी सकाळच्या सत्रात खेडगाव, शिंदी व पेंडगाव तर दुपारच्या सत्रात आढळसे, जुवार्डी व गुढे या गावांमध्ये काढण्यात आली असता याला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शिंदी येथे शेतकरी शिवसंवाद यात्रा आली असता येथे ताईंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यात ग्रामस्थांनी आधी गावातील समस्यांचा पाढा वाचला. यात प्रामुख्याने दहा वर्षांमध्ये देखील गावाचा प्रमुख रस्ता न झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, बरीचशी कामे कागदोपत्री पूर्ण करण्यात येऊन मोठा घोळ करण्यात आल्याचा आरोप देखील करण्यात आला. यावर वैशालीताई सुर्यवंशी यांनी बोलतांना जनतेला गेल्या दहा वर्षात काहीही मिळाले नसून मतदारसंघात फक्त टक्केवारीचा खेळ होऊन ठेकेदारांना मलीदा मिळत असल्याचा आरोप केला.
तसेच या यात्रेत खेडगाव येथील शांताराम पाटील, श्री माळी, विश्वास हिरे, समाधान हिरे, तुषार माळी, सलील माळी, अजय हिरे, अशोक माळी, लकी पाटील, पीरन महाजन, शांताराम पाटील आदींसह इतरांनी समस्या मांडल्या. यात प्रामुख्याने रस्त्यांसह विविध समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही वैशालीताई सुर्यवंशी यांनी दिली. शिंदी येथे योगेश पाटील, संदीप पाटील, प्रवीण पाटील, भाऊसाहेब पाटील, मधुकर पाटील, बापू महाजन यांनी समस्या मांडल्या. पेडगाव येथे बिरजू पाटील, अरूण पाटील, अजाबराव पाटील, मधुकर पाटील यांनी समस्या मांडल्या. गुढे येथील भावराव माळी, सतीश पाटील, पंडित माळी, त्ुाकाराम माळी, अविनाश माळी, हिंमत महाजन, उत्तम पाटील, धनंजय पाटील, तुकाराम पाटील, पप्पूदादा यांनी देखील समस्या मांडल्या असता ताईंनी याचे निराकरण करण्याची ग्वाही दिली.
यात्रेत गणेश परदेशी, दीपक पाटील, जे. के. पाटील, रतन परदेशी, पप्पू पाटील, योजना पाटील, उषा परदेशी, चेतन शांताराम पाटील, चेतन पाटील, रोनित अहिरे, भय्या सूर्यवंशी, सनी पाटील, मनोज पाटील, सोनू शिरसे, विकी पाटील, सत्यजित पाटील, जयेश पाटील, पृथ्वीराज पाटील, नंदू पाटील, ईश्वर पाटील, मनीषा पाटील, सुभाष महाजन, दीपक पाटील, आदींसह शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवासेना, युवती सेना, महिला आघाडी तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.