सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा व डॉ बी एस पाटील, महिंदळे भडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित.
भडगाव-
सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा व डॉ बी एस पाटील महिंदळे भडगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने 19 ऑक्टोबर रोजी टिटवी येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.
ह्यावेळेस सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा येथील डॉ.स्वप्निलदादा पाटील, डॉ.भरत पाटील, डॉ.बी एस पाटील यांनी या भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रुग्ण तपासणी केली.या आरोग्य शिबिरामध्ये 225 रुग्णांची तपासणी करण्यात आली व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजने बाबत शिबिरात आलेल्या रुग्णांना माहिती देण्यात आली.
या आरोग्य शिबिरात रुग्णांना मोफत आरोग्य तपासणी सोबत, मोफत औषधी वाटप, ईसीजी(कार्डियोग्राम /छातीची पट्टी), रक्तातील साखर, रक्तदाब तपासणी, रक्त तपासणी इत्यादी तपासण्या शिबिरा मार्फत मोफत करण्यात आल्या. आयोजक डॉ बी एस पाटील व टिटवी गावातील रुग्णांनी डॉ स्वप्निलदादा पाटील आणि सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटल टीम चे आभार मानले व मोफत आरोग्यसेवा आणि तपासण्या केल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.
सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल तर्फे डॉ. भरत पाटील, गोपाल लोखंडे, अनिल बर्वे, आरोग्यमित्र इम्रान शेख, पी आर ओ संजय पाटील, नर्स वैष्णवी महाजन, अरबाज पिंजारी हे यावेळेस उपस्थित होते.