नानासाहेब प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ.पूनमताई पाटील यांची भोजे,सावखेडा येथे प्रचाराची आघाडी.
पाचोरा-
पाचोरा भडगाव विधानसभा निवडणुकीची प्रचार फेरी चांगलीच रंगतदार सुरू झाली असून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांच्या प्रचारार्थ डॉ पूनमताई पाटील यांची दुपार सत्रात पाचोरा तालुक्यातील शिंदाड गणातील भोजे ,सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द या ठिकाणी निवडणूक प्रचार रॅली उत्साहात संपन्न झाली या रॅलीची सुरुवात भोजे या गावातून करण्यात आली तर या रॅलीचा समारोप सावखेडा बुद्रुक व सावखेडा खुर्द या ठिकाणी करण्यात आला.
या रॅलीमध्ये स्थानिक कार्यकर्ते म्हणून सावखेडा बुद्रुक येथून श्रीराम पाटील विनोद पाटील सुनील पाटील जयेंद्र पाटील राजू पाटील खंडू पाटील इत्यादी कार्यकर्ते रॅलीत सहभागी होते तर सावखेडा खुर्द या गावातून स्थानिक कार्यकर्ते म्हणून दिनेश परदेशी तुकाराम पाटील इंदल परदेशी ईश्वर परदेशी शिवाजी सोनवणे इत्यादी कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले व ठीक ठिकाणी डॉ.पूनमताई पाटील यांचे पूजन करून औक्षण करण्यात आले या रॅलीच्या माध्यमातून स्वराज्य पक्षाचे सप्तकीरणातील पेनाची निप चिन्ह हे घरोघरी पोचवून ज्येष्ठ श्रेष्ठ मतदारांचा आशीर्वाद घेण्यात आला या रॅलीमध्ये भोजे येथून स्थानिक कार्यकर्ते विनोद माळी , सहदेव घोंगडे, शितल पाटील, भूषण माळी ,अतुल पाटील,सिद्धांत भिवसने हे उपस्थित होते या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वराज्य पक्षाच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर निनादून सोडला या रॅलीसाठी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याने रॅलीमध्ये उत्साह दिसून आला या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग महिला वर्ग यांची गर्दी दिसून आली अशाप्रकारे ही रॅली अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात शिंदाड गणातील सर्वच गावांमध्ये संपन्न झाली ही अफाट अशी रॅली पाहून रॅलीची सर्वत्र चर्चा होत होती.